Congress new : मतचोरीनंतर आता कार्यालयावरही डल्ला! काँग्रेसचा शिंदेंच्या शिवसेनेवर धक्कादायक आरोप

Thane Youth Congress office, Maharashtra Congress : काँग्रेसच्या मालमत्तेवरचा प्रत्येक हल्ला हाणून पाडल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, असा इशारा काँग्रेसने दिला आहे.
Maharashtra Congress has accused the Eknath Shinde-led Shiv Sena of illegally taking over a Youth Congress office in Kisan Nagar, Thane, using allegedly forged documents and signatures.
Maharashtra Congress has accused the Eknath Shinde-led Shiv Sena of illegally taking over a Youth Congress office in Kisan Nagar, Thane, using allegedly forged documents and signatures.Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Eknath Shinde Shiv Sena news : महाराष्ट्र काँग्रेसकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. ठाण्यातील युवक काँग्रेसच्या मालकीच्या कार्यालय बेकायदेशीरपणे ताब्यात घेण्यात आल्याचा दावा काँग्रेसकडून करण्यात आला आहे. त्यासाठी बनावट कागदपत्रे तयार करण्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसकडून याबाबत सोशल मीडियात पोस्ट करण्यात आली आहे. या पोस्टमध्ये म्हटले आहे की, ठाण्यात बनावट कागदपत्रे आणि युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू चिब यांच्या खोट्या स्वाक्षऱ्यांच्या आधारे किसन नगर, वागळे इस्टेट, ठाणे पश्चिम येथील युवक काँग्रेसच्या मालकीच्या कार्यालयाचे नाव बदलून शिवसेना जनसंपर्क कार्यालय असे करण्यात आले आहे.

सत्तेच्या बळावर कायदा आणि नियमांना पायदळी तुडवण्याचा हा प्रकार आहे. काँग्रेस पक्षाच्या मालकीच्या जागेवरच बेकायदेशीरपणे दावा सांगण्याची हिंमत यांच्यात येते कुठून? आणि ठाणे शहर कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहूल पिंगळे यांनी यासंबंधित पुरावे देऊन ५० दिवसांपेक्षा जास्त काळ उलटूनही प्रशासन कारवाई का करत नाही?, असे सवालही काँग्रेसने उपस्थित केले आहेत.

Maharashtra Congress has accused the Eknath Shinde-led Shiv Sena of illegally taking over a Youth Congress office in Kisan Nagar, Thane, using allegedly forged documents and signatures.
माजी मंत्र्यांच्या लेकीने सोडली सरकारी नोकरी; आता आईच्या पावलावर पाऊल टाकणार...

कार्यालयाच्या कागदपत्रांमध्ये बेकायदेशीररीत्या हेरफार करणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करावे. तसेच, कार्यालयाची मूळ नोंद पूर्ववत करून या प्रकरणातील सर्व दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.

Maharashtra Congress has accused the Eknath Shinde-led Shiv Sena of illegally taking over a Youth Congress office in Kisan Nagar, Thane, using allegedly forged documents and signatures.
निवडणुकीत दारुण पराभव, आता भारतीय वंशाच्या महिला अधिकाऱ्याने दिला धक्का

मतचोरी असो किंवा कार्यालय हडपण्याचा प्रयत्न, लोकशाही आणि काँग्रेसच्या मालमत्तेवरचा प्रत्येक हल्ला हाणून पाडल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, असा इशाराही काँग्रेसने राज्य सरकार व ठाणे महापालिकेला दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.