Satara DCC Bank Election : सातारा जिल्हा बँकेच्या 21 पैकी 12 जागा बिनविरोध; 9 जागांसाठी निवडणूक; दिग्गजांच्या माघारीनंतर कोण बिनविरोध? कोण रिंगणात?

Satara Bank election latest News : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या काही जागा बिनविरोध झाल्या तर काही जागांसाठी निवडणूक होणार आहे.
Satara Dcc Bank Election
Satara Dcc bank election Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Satara News : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत मोठी राजकीय घडामोड पाहायला मिळाली. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी बुधवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे उत्सुकता शिगेला पोहचली होती. आरबीआयच्या नियमानुसार ज्या संचालकांनी 10 वर्ष संचालकपद भूषवले आहे, त्यांना निवडणुकीसाठी अर्ज दाखल करता येणार नसल्याने साताऱ्यातील दिग्गज नेत्यांना उमेदवारी अर्ज मागे घ्यावा लागला.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीसंदर्भात महायुतीमधील घटकपक्षांमध्ये चर्चेच्या फेऱ्या देखील सुरु होत्या. 21 पैकी 10 जागांवर महायुतीत एकमत झाले आहे. 21 जागापैकी 12 जागा बिनविरोध तर 9 जागांवर निवडणूक होणार आहे. 5 जागांवर भाजप, पाच जागांवर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस असा समझोता झाल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या काही जागा बिनविरोध झाल्या तर काही जागांसाठी निवडणूक होणार आहे.

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी बुधवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. 21 जागापैकी 12 जागा बिनविरोध तर 9 जागांवर निवडणूक होणार आहे. 10 वर्षाच्या निकषामुळे जिल्हा बँकेतून खासदार उदयनराजे भोसले (Udaynraje bhosle), मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, खासदार नितीन पाटील, माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर, माजी आ. प्रभाकर घार्गे, प्रदीप विधाते, कांचन साळुंखे या नेत्यांना अर्ज माघारी घ्यावा लागला. तर अनिल देसाई आणि राजेंद्र राजपुरे यांना न्यायालयाने अपात्र ठरवले आहे.

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत बिनविरोध झालेले उमेदवार पुढीलप्रमाणे : सत्यजित वीर (वाई सोसायटी), सर्जेराव सावंत (सोसायटी सातारा), नंदकुमार मोरे (खटाव सोसायटी), सर्वसाधारण : अतुल भोसले (Atul Bhosle) (प्रक्रिया उद्योग), मकरंद पाटील (खरेदी विक्री संघ), काका धुमाळ (गृह निर्माण दूध संस्था), रणजितसिंह नाईक निंबाळकर ( पतसंस्था ,पतपेढी), दीपक चव्हाण (अनुसूचित जाती)अर्जुन काळे (भटक्या विमुक्त), ऋतुजा पाटील वाठारकर (महिला राखीव), मंगल पाटील (महिला राखीव) हे बारा संचालक बिनविरोध निवडून आले आहेत.

Satara Dcc Bank Election
BJP Vs ShivSena : मंत्री गणेश नाईकांना एकनाथ शिंदेंचा धक्का : नगरविकास खात्याने भाजपचा क्लस्टर स्थगिती ठराव गुंडाळला

सातारा जिल्ह्यातील लढती पुढीलप्रमाणे:

1) विठ्ठल गोळे vs ज्ञानदेव रांजणे (जावली)

2) रूपाली राजपुरे vs संजय मोरे (महाबळेश्वर)

3) जयकुमार गोरे vs शेखर गोरे, मनोज पोळ

4) चंद्रकांत जाधव vs सुनील वाघ

5) शंभूराज देसाई vs सत्यजित पाटणकर

6) उदयसिंह उंडाळकर vs धनाजी पाटील

7) सुनील माने vs सुनील खत्री

8) योगेश फडतरे vs संदीप पाचंगणे

9) अनिरुद्ध गाडवे vs अजय भोसले

10) संजीवराजे नाईक निंबाळकर vs समशेरसिंह नाईक निंबाळकर

Satara Dcc Bank Election
BJP Politics : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत मुस्लिम चेहरा; नितीन नवीन यांच्या टीममधील 'या' चेहऱ्याची तुफान चर्चा!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com