Shirdi Politics : शिर्डीवरून 'मातोश्री'वर खडाजंगी; बबनराव घोलप की भाऊसाहेब वाकचौरे ? ठाकरेंसमोर मोठा पेच

Babanrao Gholap- Bhausaheb Wakchaure : बबनराव घोलप यांनी तातडीने उद्धव ठाकरे यांची भेट घेत नाराजी व्यक्त केली.
Babanrao Gholap, Uddhav Thackeray, Bhausaheb Wakchaure
Babanrao Gholap, Uddhav Thackeray, Bhausaheb Wakchaure Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर आगामी लोकसभा निवडणुकीत शिर्डी मतदारसंघातून भाऊसाहेब वाकचौरे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. पण वाकचौरेंच्या नावाला ठाकरे गटातील स्थानिक पदाधिकाऱ्यांनीच विरोध केल्यामुळे ठाकरेंसमोर आता मोठा पेच निर्माण झाला आहे.

शिर्डी लोकसभेसाठी गद्दार नको, खुद्दार हवा, अशी भूमिका स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आधिपासून घेतलेली असतानाच सोमवारी माजी मंत्री बबनराव घोलप यांनी थेट 'मातोश्री'वर धाव घेत याबाबत नाराजी व्यक्त केली. एवढंच नाही तर शिर्डी लोकसभा मतदारसंघावरून 'मातोश्री'वर जोरदार खडाजंगी झाल्याचेही सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

Babanrao Gholap, Uddhav Thackeray, Bhausaheb Wakchaure
Shirdi Lok Sabha : शिर्डीत रंगणार पुन्हा एकदा आठवले-वाकचौरे लक्षवेधी लढतीचा थरार; कुणाचं पारडं जड ?

लोकसभेच्या निवडणुकीला अवघे काही महिने बाकी आहेत. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे हे लोकसभा मतदारसंघनिहाय आढावा घेत आहेत. भाऊसाहेब वाकचौरे यांनी ठाकरे गटात प्रवेश करण्याच्या आधी शिर्डीतून बबनराव घोलप यांच्या नावाची चर्चा होती. पण वाकचौरेंच्या घरवापसीमुळे ठाकरे गटात पेच निर्माण झाला असून पादाधिकाऱ्यांमध्ये दोन गट पडल्याचे चित्र आहे. त्यामुळे भाऊसाहेब वाकचौरे विरुद्ध बबनराव घोलप यांच्यातच जुंपण्याची शक्यता आहे.

भाऊसाहेब वाकचौरे यांच्या शिर्डी मतदारसंघातून निवडणूक लढवण्याच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर बबनराव घोलप यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेत वाकचौरेंच्या उमेदवारीला विरोध केला असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे ठाकरे यावर काय मार्ग काढतात, हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

Babanrao Gholap, Uddhav Thackeray, Bhausaheb Wakchaure
Shivsena Local Leader opposed to Wakchaure : गद्दार नको, खुद्दार हवा; भाऊसाहेब वाकचौरेंच्या प्रवेशाला ठाकरे गटाच्या स्थानिक नेत्यांचा विरोध

शिर्डी लोकसभा मतदारसंघात घोलप यांना संपर्क प्रमुख नेमून नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्याच्या सूचना उद्धव ठाकरेंनी दिल्या होत्या. मात्र, ठाकरेंनी जुन्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेत वाकचौरेंच्या उमेदवारी संदर्भात चर्चा करत उमेदवारीचे संकेत दिल्याने घोलप अस्वस्थ झाल्याचे बोलले जात आहे. याच अनुषंगाने उद्धव ठाकरे यांची भेट घेत घोलप यांनी तीव्र नाराजी व्यक्त केल्याचे सांगण्यात येत आहे.

Edited By : Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com