Konkan Graduate Constituency : भाजपच्या निरंजन डावखरेंना मनसेचे अभिजित पानसे देणार टक्कर?, खुद्द ठाकरेंनी घेतली निवडणूक हाती

MNS News : खुद्द मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी ही निवडणूक हाती घेतली असून, आज ते ठाण्यात यासंदर्भात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
Abhijit Panse
Abhijit PanseSarkarnama

Mumbai News : कोकण पदवीधर मतदारसंघात या वेळी भारतीय जनता पक्षाचे निरंजन डावखरे यांना कडवे आव्हान मिळण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून कोकण पदवीधर मतदारसंघाची जोरदार मोर्चोबांधणी सुरू आहे. खुद्द मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी ही निवडणूक हाती घेतली असून, आज ते ठाण्यात यासंदर्भात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. मनसेकडून अभिजित पानसे या मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची शक्यता. याशिवाय महाविकास आघाडीचा उमेदवारही असणार आहे. त्यामुळे आमदार डावखरेंना या वेळी जादा कष्ट घ्यावे लागण्याची शक्यता आहे. (Abhijit Panse from MNS will contest from Konkan graduate constituency)

कोकण पदवीधर मतदारसंघात पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे जिल्हे येतात. या पट्ट्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ताकद बऱ्यापैकी आहे. त्यातच पदवीधर निवडणुकीबाबत मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी एका सभेत भाष्य करून हे मतदारसंघ गांभीर्याने लढण्याचे संकेत दिले होते. त्यानुसार कोकण पदवीधर मतदारसंघाची तयारी मनसेने गेल्या काही दिवसांपासून जोरदारपणे केली आहे. कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून, सध्या मतदार नोंदणी मोठ्या प्रमाणात सुरू आहे.

Abhijit Panse
Kolhapur Politics : 'सरकारनामा'चा अंदाज ठरला खरा; मेहुण्या-पाहुण्यांचं फिसकटलं, ए. वाय. पाटील-आबिटकरांचं जमलं

दरम्यान, मनसेप्रमुख राज ठाकरे गेल्या काही दिवसांपासून निवडणुकांच्या तयारीचा आढावा घेत आहेत. त्याच दृष्टिकोनातून ते आज ठाण्याच्या दौऱ्यावर आहेत. या वेळी लोकसभा आणि कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीबाबत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे. विशेषतः कोकण पदवीधर मतदारसंघाच्या रणनीतीबाबत राज ठाकरे हे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. मनसेचा सुशिक्षित चेहरा म्हणून ओळख असलेले अभिजित पानसे हे या मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत.

उमेदवार कोण हा निर्णय राज ठाकरे घेणार आहेत. अभिजित पानसे हे आमच्यामधील सुशिक्षित चेहरा आहे. पानसेंचे सर्व कुटुंबीय हे शैक्षणिक क्षेत्रासाठी काम करत आहेत. पानसे यांची आई प्रिन्सिपल होत्या, वडील विविध आश्रमशाळा चालवतात. अभिजित हे स्वतः डायरेक्टर आहेत. त्यांची मुलगी एका चांगल्या फिल्डमध्ये काम करत आहेत. ते एका सुशिक्षित घरातून येतात आणि राज ठाकरे यांनी संधी दिली, तर ते लढण्यास इच्छुक आहेत, असे अविनाश जाधव यांनी सांगितले.

मनसेकडून आतापर्यंत जवळजवळ १६००० ते १७००० पदवीधरांची नोंदणी मागच्या एका महिन्यात केलेली आहे. आमची नोंदणी उत्तम चालू आहे, आम्ही जवळपास ४० ते ४५ हजार नोंदणीपर्यंत पोचू आणि जर ४०-४५००० तुमचा टार्गेटपर्यंत आम्ही पोहोचलो, तर नक्की पुढची निवडणूक ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिंकून येईल, असा दावाही जाधव यांनी केला आहे.

Abhijit Panse
Lok Sabha Election 2024 : महायुतीत राडा होण्याची चिन्हे? भाजपचे सर्वेक्षण, अनेक खासदारांची दांडी गुल होणार!

भारतीय जनता पक्ष फक्त स्वतःचे मतदार नोंदवितात. विरोधातील एकही मतदार ते नोंदवित नाहीत. सर्व पदवीधरांची नोंदणी केली, तर भाजपच्या विरोधात एक ग्रुप किंवा उमेदवार तयार होईल, अशी भीती भाजपला वाटते. महाराष्ट्र नवनिर्माण सेना पहिल्या दिवसापासून यामध्ये उतरली आहेत. त्यामुळे आम्ही ताकदीने ही निवडणूक लढवणार आणि जिंकणार, असेही जाधव यांनी स्पष्ट केले.

Abhijit Panse
Sugarcane FRP Issue : स्वाभिमानीच्या जिल्हाध्यक्षाला पोलिसांनी घरातून उचललं; आंदोलनाचा भडका उडणार?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com