देवगाव : अतिवृष्टीमुळे (Heavy Rainfall) नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना (Affected Farmers) सरकारकडून (Assistancs from government) मदत मिळवून देऊ, असे आश्वासन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी दिले. (Chhagan Bhujbal assures farmers for government assistance)
निफाड तालुक्यातील देवगाव परिसरातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेताची पाहणी केल्यानंतर त्यांच्या हस्ते रस्त्याच्या कामांचे भूमिपूजन झाले. त्यावेळी ते बोलत होते.
छगन भुजबळ म्हणाले, की कोरोना काळात विकासकामांना ब्रेक लागला होता. तरीही आम्ही विकासकामांकडे लक्ष दिले. आता विविध कामे सुरू होत आहेत. मागील काळात जिल्हा नियोजन समितीचा निधी आपण समप्रमाणात आमदारांच्या मागणीप्रमाणे दिला होता.
अधिकाऱ्यांना समप्रमाणातच वाटप करा, असे सांगितले होते. मात्र, नवीन सरकारने हा निधी थांबविला होता. आता आलेले पालकमंत्री पुन्हा त्याचा आढावा घेणार आहेत. त्यातून आलेल्या निधीतून आपण चांगली विकासकामे करू. जनतेची विकासकामे थांबणार नाहीत.
दरम्यान, देवगाव फाटा (ता. निफाड) येथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७, भरवस फाटा-देवगाव फाटा-सावळी विहीर रस्ता, देवगाव फाटा या रस्त्यांच्या दुरुस्तीयाच्या कामाचे भूमिपूजन छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी भाऊसाहेब भवर, भाऊसाहेब बोचरे, सरपंच सचिन दरेकर, सरपंच नलिनी गांगुर्डे, विनोद जोशी, अशोक नागरे, आत्माराम दरेकर, शिवाजी सुपनर, विलास गोरे, माधव जगताप, मनोहर बोचरे, बापूसाहेब आहेर, अशोक महाले, साहेबराव शिंदे, रामचंद्र शिंदे, अशोक वाळुंज, राजेंद्र पाटील आदी उपस्थित होते.
---
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.