Yeola Politics : येवल्यात दराडे बंधूंना धक्का ; अखेर अमोल शिंदेंनी निर्णय घेतला, भुजबळांच्या ताफ्यात सामील

Amol Shinde Joins NCP in Yeola : येवल्यात नरेंद्र दराडे व किशोर दराडे यांना मोठा धक्का बसला आहे. अमोल शिंदे यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत अखेर समीर भुजबळांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीत प्रवेश केला.
Amol Shinde joins NCP in Yeola
Amol Shinde joins NCP in YeolaSarkarnama
Published on: 
Updated on: 

Yeola Politics : येवल्यात दराडे बंधूंना मोठा धक्का बसला आहे. स्थानिक नेतृत्वावर नाराजी व्यक्त करत अखेर अमोल शिंदे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीत अधिकृत प्रवेश केला. माजी खासदार समीर भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत शेकडो समर्थकांसह त्यांनी शिवसेनेचा धनुष्यबाण सोडून हातात घड्याळ घातलं. येवल्यात सोमवार (दि. ५) रोजी हा प्रवेश सोहळा पार पडला.

अमोल शिंदे हे युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख म्हणून कामकाज पाहत होते. मात्र, शिवसेनेकडून त्यांना कोणतेही अधिकृत नियुक्तीपत्र न दिल्याचे स्थानिक नेतृत्वाकडून सांगण्यात आल्याने ते नाराज होते. राष्ट्रवादीत प्रवेश करताच त्यांच्यावर उपजिल्हाध्यक्ष व येवला मतदारसंघातील प्रवक्ते पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

विधानपरिषद निवडणुकीत नरेंद्र दराडे यांचा पराभव झाल्यानंतर अमोल शिंदे यांच्या नेतृत्वात येवला नगरपालिकेतील शिवसेनेच्या 7 नगरसेवकांचा एक गट समीर भुजबळ यांच्या भेटीसाठी गेला होता. त्यावेळी अमोल शिंदे यांनी आमदार किशोर दराडे व कुणाल दराडे यांच्या कार्यशैलीवर तीव्र नाराजी व्यक्त केली होती. विधान परिषद निवडणुकीत आमच्यावर अविश्वास दाखवल्याची खंत शिंदे यांनी बोलून दाखवली होती. नगरसेवकांसह राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा इशारा त्यांनी दराडे बंधूंना दिला होता.

Amol Shinde joins NCP in Yeola
Nandurbar Lok Sabha : भाजपच्या हक्काच्या मतदारसंघावर शिवसेना आमदाराने ठोकला दावा, म्हणे एकनाथ शिंदेंचा आदेश आहे, लढणारच...

राज्यात सत्तेत असलेल्या भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी यांच्यातील फॉर्म्युल्यानुसार निवडून आलेल्या नगरसेवकांना राष्ट्रवादीत प्रवेश घेता येणार नसल्याने, तसेच त्यांच्यासमोर कोणताही कायदेशीर पेच निर्माण होऊ नये म्हणून केवळ अमोल शिंदे यांना प्रवेश दिल्याचे सांगितले जात आहे.

Amol Shinde joins NCP in Yeola
Jalgaon Politics : SIR च्या निमित्ताने विधानसभेची रंगीत तालीम, जळगावात राष्ट्रवादीने दोन माजी मंत्र्यांसह 11 नेत्यांना उतवलं मैदानात

पक्षप्रवेशावेळी आपण शिवसेनेवर नाराज नसून स्थानिक नेतृत्वावर नाराज असल्याचं अमोल शिंदे यांनी स्पष्ट केलं. यावेळी त्यांनी नाव न घेता दराडे बंधूंवर निशाणा साधला. वाटेल तेव्हा भुजबळांचे सहकार्य घ्यायचं, नंतर त्यांच्यावरच उलटायचं असं त्याचं राजकारण आहे. मला पद दिलं, मात्र कोणतही नियुक्तीपत्र दिलं नव्हतं. अशाप्रकारे अधिकृत नियुक्ती पत्र न देता कार्यकर्त्यांचा केवळ उपयोग करुन घ्यायचा हे योग्य नसल्याची टीका त्यांनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com