

Nashik Politics : येवला नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादीच्या विरोधात लढलेले शिवसेनेचे दराडे गटाचे सात नगरसेवक गेल्या आठवड्यात माजी खासदार समीर भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात दाखल झाल्याने येवल्याचा राजकारणात एकच खळबळ उडाली.
यावेळी, उर्वरित तीन नगरसेवकही आमच्या संपर्कात असल्याचा दावा समीर भुजबळांनी केला. या नगरसेवकांनी भुजबळ फार्मवर जाऊन नुकतीच मंत्री छगन भुजबळ यांची देखील भेट घेतली. विधानपरिषदेच्या पराभवाचा धक्का पचवत नाही तोच दराडे बंधूंसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
या 7 नगरेसवकांनी अधिकृत राष्ट्रवादीत प्रवेश केला नसला तरी आमदार किशोर दराडे व कुणाल दराडे यांच्या कार्यपद्धतीवर उघडपणे नाराजी व्यक्त केली. समीर भुजबळांच्या कार्यालयात पत्रकारपरिषद घेऊन त्यांनी आपली भूमिका मांडली. आपल्याला त्रास झाल्यास पक्ष सोडून राष्ट्रवादीत जाण्याचा इशारा या नगरसेवकांनी दिला. सध्या हे नगरसेवक युती म्हणून समीर भुजबळांसोबत गेले आहेत. मात्र, शिवसेनेने हे नगरसेवक आमच्यासोबतच असल्याचा दावा केला आहे.
येवल्यात काल दराडे बंधूंनी (नरेंद्र दराडे व आमदार किशोर दराडे) पत्रकार परिषद घेतली. एकीकडे नगरसेवक राष्ट्रवादीसोबत गेले म्हणतात तर कधी आजून गेलेले नाही, आमच्यासोबतच आहे असे सांगतात या विरोधाभासावर पत्रकारांनी विचारलं असता, किशोर दराडे म्हणाले... "पक्षाचा राजीनामा दिला असता तर गेले असे म्हणता आले असते. पण आजून एकानेही राजीनामा दिलेला नाही म्हणून ते आमच्या पक्षात आहेत असचं आम्ही म्हणणार असं किशोर दराडेंनी स्पष्ट केलं".
दरम्यान नगसेवकांनी पत्रकापरिषदेत थेट आपले नाव घेऊन नाराजी व्यक्त केली होती, त्याविषयी प्रश्न केला असता...नाराजी व्यक्त करायला काही मुद्दा असावा लागतो. काही मुद्दाच नसताना नाराजी व्यक्त करणं चुकीचं असल्याचं किशोर दराडे म्हणाले. का नाराजी व्यक्त केली हे सगळ्या येवला तालुक्याला माहिती आहे, ते कुणाला सांगायची गरजच नाही. नगरविकास खात्याकडून येणाऱ्या निधीवर बोलताना निधी गावासाठी येतो, प्रत्येकाचा त्याच्यावर अधिकार असतो असं दराडे म्हणाले.
शिवसेना जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे यांनीही शिवसेनेचे सगळे नगरसेवक आमच्यासोबत आहे. नगरविकास खाते एकनाथ शिंदेकडे आहे. त्यामुळे शिवसेना कुणाला काही कमी पडू देत नाही. युती म्हणून ते समीर भुजबळ यांच्याभेटीसाठी गेले असतील. पण ते सगळे शिवसेनेतच आहे असा दावा तांबडे यांनी केला.
जनता दरबार भरवणार
दरम्यान, शिक्षक मतदारसंघाचे आमदार किशोर दराडे यांनी सामान्य शेतकरी आणि सामान्य नागरिकांचा जनता दरबार भरविणार असल्याचे जाहीर केले. आमच्या कार्यकर्त्यांच्या अनेक समस्या आहेत. कामे होत नाहीत. मागची विधानसभा झाल्यापासून अनेक ग्रामपंचायतींना वेठीस धरलं आहे. सामान्य माणसाला त्रास होतो आहे. त्यामुळे प्रत्येक महिन्याला आम्ही तहसील कार्यालयाच्या तिथं सामूहिक मीटिंग घेणार आहोत. लोकांच्या विविध समस्या सोडवणे हा या मागचा उद्देश असून आम्ही सर्व अधिकाऱ्यांना एकत्र बोलवणार व जनता दरबार भरवणार व त्यातून लोकांचे प्रश्न सोडवणार असल्याचं किशोर दराडेंनी सांगितलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.