Yeola Politics : विधानपरिषदेतील पराभवानंतर दराडे बंधूंना आणखी एक मोठा हादरा ; शिवसेनेच्या 7 नगरसेवकांनी फडकावले बंडाचे निशाण

Seven Shiv Sena Corporators Revolt Against the Darade Brothers : शिवसेनेचे दराडे गटाचे 7 नगरसेवक हे थेट समीर भुजबळ यांच्या भेटीसाठी त्यांच्या कार्यालयात दाखल झाले. त्यांनी किशोर दराडे व कुणाल दराडेंवर उघड नाराजी व्यक्त केली.
Narendra Darade, Kishor Darade
Narendra Darade, Kishor Darade Sarkarnama
Published on
Updated on

Maharashtra political news : नाशिक विधानपरिषद निवडणुकीत शिवसेनेचे नरेंद्र दराडे यांचा अपक्ष उमेदवार गोकुळ गिते यांनी दारुण पराभव केला. या पराभवानंतर आता दराडे बंधूंना येवल्यात आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. येवल्यातील शिवसेनेच्या 7 नगरसेवकांनी बंडाचा इशारा दिला आहे.

आमदार किशोर दराडे व कुणाल दराडे यांच्या कार्यशैलीवर तीव्र नाराजी व्यक्त करत शिवसेनेच्या येवला नगरपालिकेतील 7 नगरसेवकांनी आज मंत्री छगन भुजबळ यांचे येवल्यातील संपर्क कार्यालय गाठले. सातही नगरेवकांनी माजी खासदार समीर भुजबळ यांची भेट घेतली. या भेटीनंतर हे 7 नगरसेवक आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात सामील होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले असून येवल्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

शिवसेना उपजिल्हाप्रमुख असलेले अमोल शिंदे यांनी यावेळी आमदार किशोर दराडे व कुणाल दराडे यांच्या कार्यपद्धतीवर उघडपणे नाराजी व्यक्त केली. विधान परिषद निवडणुकीत आमच्यावर अविश्वास दाखवल्याची खंत शिंदे यांनी बोलून दाखवली.

Narendra Darade, Kishor Darade
Maharashtra News Live Update : एकनाथ शिंदेंनी बंडखोर खासदारांना तुडवा म्हणणाऱ्या संजय राऊतांना दिलं आव्हान

अमोल शिंदे म्हणाले, विधानपरिषद निवडणुकीच्यावेळी किशोर दराडे हे आम्हाला विश्वासात न घेता समीर भुजबळ यांच्या भेटीसाठी गेले. पालिका निवडणुकीत आम्ही त्यांच्यासाठी राष्ट्रवादीच्या व भुजबळ साहेबांच्या विरोधात भूमिका घेतली आणि समीर भुजबळांना भेटण्याची वेळ आली तर ते एकटे परस्पर गेले. आम्हाला विश्वासात घेतलं नाही त्यामुळे आपण नाराज असल्याचं अमोल शिंदे म्हणाले. आम्हाला वाटलं आम्ही दोघे-तिघे नाराज असू परंतु भेट घेतल्यावर समजलं सर्वच्या सर्व शिवसेनेचे १० नगरसेवक नाराज आहेत असा दावा शिंदे यांनी केला.

राजकारणात हार-जीत होत असते. कुणी निवडून येतं तर कुणी पडतं. लोकशाहीत कुणी कुणाला मतदान केलं हे सांगता येत नाही. २५० च्या आसपास मतदान दराडेंना झालं. त्यात तुम्ही कसं काय ठरवू शकतात की कुणी मतदान दिलं कुणी नाही असं अमोल शिंदे म्हणाले.

Narendra Darade, Kishor Darade
Gokul Gite : '100 पेक्षा जास्त मतांनी जिंकलो तर स्वीकारा'; गोकुळ गितेंनी श्रीकांत शिंदेंसोबतच्या गुप्त भेटीचा केला गौप्यस्फोट

आम्ही सर्व पदाधिकारी व सात नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेशच करणार होतो. मात्र तुम्हाला त्रास नको म्हणत समीर भुजबळांनी आम्हाला युती म्हणून एकत्र राहण्याचा सल्ला दिला. परंतु त्रास झाल्यास सातही नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करतील असं शिंदे म्हणाले. आमची पुन्हा निवडणूक लढण्याची तयारी असल्याचा इशारा देत नगरसेवकांनी दराडे बंधूंच्या विरोधात बंडाचे निशाणा फडकावले आहे.

दरम्यान समीर भुजबळ यांनी सांगितलं की, महायुती म्हणून आम्ही येवल्यातील नगरसेवकांची ही बैठक बोलावली होती. या बैठकीला शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजपचे असे महायुतीतील तीन्ही पक्षांचे नगरसेवक उपस्थित होते. महायुती म्हणून आम्ही लोकसभा आणि विधानपरिषद निवडणूक एकत्रित लढलो आहोत. मात्र, नगरपालिका निवडणुकीत समीकरणे वेगळी असतात. त्यामुळे इथे शिवसेना वेगळी आणि राष्ट्रवादी व भाजप आम्ही मिळून वेगळे लढलो.

नाशिक महापालिकेत तर राष्ट्रवादी व शिवसेना असे आम्ही एकत्र होतो. आमच्यासमोर भाजप होती. मात्र, निवडणुकीनंतर आम्ही तिथे एकत्र आलो. त्याच धर्तीवर येवल्यात आता महायुती म्हणून आम्ही सगळे एकत्रित येत आहोत. येवला शहराच्या विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन आम्ही पुढे चालणार असल्याचं सांगितलं.

दरम्यान, समीर भुजबळ यांनी जरी ही केवळ महायुतीची बैठक असल्याचे म्हटले असले, तरी विधान परिषद निवडणुकीतील पराभवानंतर दराडे यांच्या विरोधात थेट त्यांच्याच नगरसेवकांनी बंडाचे निशाण फडकावल्याने हा दराडे बंधू यांच्यासाठी मोठा हादरा आहे. यातून येवल्यातील शिवसेनेची ताकद कमालीची घटणार असून भुजबळांना अधिक बळ मिळणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com