कोरोनामध्ये गर्दी जमविणे तीन नगरसेवकांना पडले महागात

शहरातील सहा नगरसेवक राजकीय कार्यक्रम केल्याने अडचणीत आले आहेत.
Covid19 Corporators Nashik
Covid19 Corporators NashikSarkarnama
Published on
Updated on

नाशिक : कोरोना (Covid) महामारीच्या (Epidemic) पार्श्वभूमिवर शहरात मनाई आदेश (Polce Act & Curfew) कायम असतांना विनापरवानगी विकास कामांचे उदघाटन (Program) करून गर्दी (Crowd) जमविल्याप्रकरणी सहा नगरसेवकांविरूध्द (Corporators) पोलीसांनी गुन्हे दाखल केले आहे. त्यात तीन नगरसेविकांचा समावेश असून पश्चिम विधानसभा मतदार संघातील हे नगरसेवक आहेत.

Covid19 Corporators Nashik
नारायण राणेंच्या जबाबाबाबत पोलिसांचे तोंडावर बोट!

दीपक दातीर, डी.जी.सुर्यवंशी, सुवर्णा मटाले, प्रतिभा पाटील, भागवत आरोटे, मधूकर जाधव अशी गुन्हे दाखल करण्यात आलेल्या नगरसेवकांची नावे आहेत.महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर शहरात विकास कामांचे उदघाटन आणि लोकार्पण सोहळ्याचा धडाका सुरू झाला आहे. कोव्हीड १९ च्या पार्श्वभूमिवर लॉकडाऊन शिथील करण्यात आले असले तरी मनाई आदेश कायम आहे. त्यामुळे कोरोना संसर्ग टाळण्यासाठी गर्दी आणि उपस्थीवर मर्यादा आल्या आहेत. तरीही लोकप्रतिनीधींकडून त्याचे उलंघन होतांना दिसू लागले आहे. औद्योगीक वसाहतीतील प्रभाग क्र. २६ मधील वडारवाडी भागातील हॉटेल पंचरत्न मागे शिवसेनेचे नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख रस्ता कॉक्रेटीकरणाचे उदघाटन झाले.

प्रभाग क्र.२८ मधील महालक्ष्मीनगर भागातील छत्रपती शिवाजी महाराज समाज मंदिर येथील पाण्याच्या टाकीचा रविवारी लोकार्पण सोहळा पार पडला. या दोन्ही कार्यक्रमासाठी संबधीत नगरसेवकांनी गर्दी जमविल्याचा आरोप आहे. कोविड १९ च्या संसर्गामुळे लोकांच्या जिवीतास धोका निर्माण होईल याची जाणीव असतांनाही त्यांनी महिला पुरूषांची गर्दी जमवून शासनाच्या सुचनांकडे आणि पोलीस आयुक्तांच्या मनाई आदेशाचे उलंघन केल्याचे पोलीसांच्या वतीने देण्यात आलेल्या तक्रारीत म्हटले आहे. अंबड पोलीस ठाण्याचे कर्मचारी सचिन सोनवणे यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली असून अधिक तपास उपनिरीक्षक शेवाळे आणि पवार करीत आहेत.

....

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com