नाशिक : मुख्यमंत्र्यांबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात नाशिक पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याबाबत काल श्री. राणे यांनी पोलिस आयुक्त दीपक पांडे यांच्याकडे ऑनलाईन जबाब दिला. मात्र त्यांनी काय म्हटले याबाबत पोलिसांनी गोपनियता बाळगली. राणेंनी काय जबाब दिला? याबाबत पोलिसांनी तोंडावर बोट ठेवले.
नाशिक पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शनिवारी मुंबईतून ऑनलाइन जबाब नोंदविला. पोलिस आयुक्त दीपक पांडे, उपायुक्त संजय बारकुंड या वेळी उपस्थित होते.
भाजपतर्फे काढण्यात आलेल्या जनआशीर्वाद यात्रेदरम्यान २४ ऑगस्टला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी श्री. राणे यांच्याविरोधात सायबर पोलिस ठाण्यासह राज्यात इतरत्र गुन्हे दाखल झाले होते. नाशिकला शिवसेनेचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी राणेंविरोधात तक्रार दिली होती. त्यानंतर शिवसेना व भाजपचे पदाधिकारी आमनेसामने आले होते. गुन्हा दाखल होताच शहर पोलिसांचे पथक श्री. राणे यांना अटक करण्यासाठी रत्नागिरीला गेले होते. दरम्यान, राणे यांना न्यायालयाने सशर्त जामीन दिला होता. जबाब नोंदवण्यासाठी शहर पोलिसांनी राणे यांना नोटीस पाठविली होती. त्यानुसार ते २ सप्टेंबरला नाशिक पोलिसांसमोर हजर राहणार होते. मात्र, गणेशोत्सवाचे कारण देऊन त्यांच्या वकिलांनी तारीख वाढवून घेतली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांनी राणेंच्या वकिलांशी बोलून ऑनलाइन जबाब घेण्याचे निश्चित केले होते.
या प्रकरणात उच्च न्यायालयाने राणे यांचा जामीन मंजूर करताना १७ सप्टेंबरपर्यंत कोणतीही कारवाई न करण्याचे आदेश राज्य सरकारला दिले होते. त्यामुळे राणे यांचा शहर पोलिसांना जबाब नोंदवता आलेला नव्हता. शनिवारी पोलिस उपायुक्त संजय बारकुंड यांच्यासह गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी मंत्री राणे यांचा ऑनलाइन जबाब नोंदवला. यात, पोलिसांनी घटनेबाबत प्रश्न विचारले, तर राणे यांनी त्यास उत्तरे दिली.
...
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.