Loksabha Election : लोकसभा निवडणुकीमध्ये जागावाटपावरून महायुतीमध्ये तिढा आहे. एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना सोबत घेऊनही भाजपला हवा तेवढा फायदा होताना दिसत नसल्याचे अनेक सर्व्हे सांगत आहेत. जागा वाटपावरून महायुतीत अजुनही तिढा आहे. त्यात लोकसभा निवडणुकीनंतर दोन महिन्यांनी तु्म्हाला एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, असा खळबळजनक दावा वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी हिंगोलीमध्ये केला आहे.
भाजप फक्त लोकसभा निवडणुकी पुरता एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा वापर करत असल्याचा दावा काही नेते करत होते. आता प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) शिंदे यांचा फायदा भाजपला होताना दिसत नाही त्यामुळे विधानसभा निवडणुकीत वेगळं चित्र दिसू शकते. असे म्हणत शिंदे गटाचे टेन्शन वाढवले आहे.
प्रकाश आंबेडकरांनी आपल्या भाषणात पंतप्रधान मोदींना टार्गेट केले. देशाची आर्थिकस्थिती चांगली असती तर लोक देशसोडून गेले असते का? 17 लाख कुटुंबांनी देश सोडला आहे. ते मुस्लिम, ख्रिश्चन नाहीत ते हिंदू आहेत. त्यांची 50 कोटीची मालमत्ता आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला मी विचारतोय तुम्ही कोणत्या तोंडाने मोदीला पंतप्रधान करण्यासाठी मत मागत आहात? तुम्हाला लाज कशी वाटत नाही? असा सवाल देखील प्रकाश आंबेडकर यांनी विचारला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
नरेंद्र मोदी हे पुन्हा सत्तेत आले तर ते संविधान बदलल्या शिवाय राहणार नाहीत. हे थांबवण्यासाठी पंतप्रधान मोदी यांच्याविरोधात मतदान करा,असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले. या आधी देखील चंद्रपूरच्या सभेत प्रकाश आंबेडकरांनी मोदींनी भारतीय जनता पक्ष संपवण्याचा मार्ग अवलंबला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारतीय जनता पक्षाचे सरकार असे संबोधित नाहीत. कोणतीही योजना आली की, ती सरकारची आहे असे न मांडता ती नरेंद्र मोदींची आहे अशी मांडली जाते, अशी टीका केली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.