Revenue Department : महसूल प्रशासनात खळबळ: तब्बल 7 नायब तहसीलदारांवर कारवाई, खोटी माहिती दिली अन्..., 23 लाखांची वसुलीचे आदेश

Action Against Naib Tehsildars Amravati : सात नायब तहसीलदारांकडून एकुण 23 लाख रुपये वसूल करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
Seven Naib Tehsildars face departmental action as the District Collector orders recovery of Rs 23 lakh in the matter.
Seven Naib Tehsildars face departmental action as the District Collector orders recovery of Rs 23 lakh in the matter.sarkarnama
Published on
Updated on

Tehsildars News : महसूल प्रशासनातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. खोट्या माहितीच्या आधारे पदोन्नती घेत अतिरिक्त वेतन लाटणाऱ्या सात नायब तहसीलदारांवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. शासनाने दिलेले अतिरिक्त वेतन वसूल करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. अमरावती विभागातील सात नायब तहसीलदारांवर ही कारवाई करण्यात आली आहे. या विषयीचे वृत्त 'न्यूज 18 मराठी' वृत्त संकेतस्थळाने दिले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्मीकांत तिवारी, अविनाश हाडोळे, संजय मुरतकर, संदीप टांक, प्रशांत देशमुख, श्यामसुंदर देशमुख आणि संजय आवारे अशी नायब तहसीलदारांची नावे आहेत. ते दहा वर्षांपूर्वी अव्वल कारकून किंवा मंडळ अधिकारी संवर्गात होते. त्यावेळी त्यांनी खोट्या माहितीच्या आधारे २००४ आणि २००५ या वर्षांचे मानीव दिनांक लागू करून घेतले. त्यानंतर त्यांना बढती, पदोन्नती मिळत गेली. मात्र, हक्क डावलेल्या काही कर्मचाऱ्यांचा याची रितसर तक्रार दिली होती.या तक्रारीच्या तपासणीनंतर मानीव दिनांकाचे आदेश मागे घेतले गेले. त्यामुळे या सात जणांचा खोटी माहिती लावून घेतल्याचे समोर आले.

वेतन वसूल होणार

मानवी दिनांकामुळे बढती मिळाल्यानंतर त्या अधिकाऱ्यांना ठरावी काळासाठी अतिरिक्त वेतन म्हणजे ऐरियर्स म्हणजे अतिरिक्त वेतन देखील मिळाले होते. या सातही अधिकाऱ्यांना मिळालेल्या अतिरिक्त वेतनाची रक्कम तब्बल 23 लाख 65 हजार 756 रुपये होत होती. ती वसूल करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे.

मानीव दिनांक म्हणजे काय?

“मानीव दिनांकाचे आदेश” हा प्रशासकीय भाषेतील शब्द आहे. इंग्रजीत याला Deemed Date Order असे म्हणतात. एखाद्या सरकारी कर्मचाऱ्याची प्रत्यक्ष नियुक्ती, पदोन्नती किंवा रुजू होण्याची तारीख एक असते, पण नियमांनुसार त्याला त्यापेक्षा पूर्वीची एखादी तारीख ग्राह्य धरली जाते, त्याला मानीव दिनांक म्हणतात. दरम्यान, खोटी माहिती देत सातही नायब तहसीलदारांनी मानवी दिनांक लावून घेतली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com