आदित्य ठाकरेंचा मनसेला झटका; शॅडो कॅबिनेटमधील वनमंत्र्यांचा शिवसेनेत प्रवेश

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला (MNS) शिवसेनेचे (Shivsen) नेते आणि राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी धक्का दिला आहे.
Aditya Thackeray
Aditya Thackeraysarkarnama

अकोला : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला (MNS) शिवसेनेचे (Shivsen) नेते आणि राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी धक्का दिला आहे. राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या शॅडो कॅबिनेटमध्ये असलेले अकोल्यातील आदित्य दामले (Aditya Damle) यांनी मनसेला जय महाराष्ट्र करत शिवसेनेत प्रवेश केला. आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवबंध बांधले.

आदित्य दामले हे राज ठाकरे यांच्या शॅडो मंत्रालयात वनमंत्री होते. आदित्य दामले यांच्याकडे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष पद होते. मनसे पक्ष स्थापनेच्या आधीपासून आदित्य दामले हे राज ठाकरेंच्या भारतीय विद्यार्थी सेनेते सक्रिय होते. राज यांनी मनसे स्थापन केल्यावर आदित्य दामले मनसेत दाखल झाले होते.

Aditya Thackeray
सिंधुदुर्गमधील भाजपच्या निष्ठावंत राणेंचा शिवसेनेत प्रवेश

त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष पदावर त्यांची नेमणूक झाली होती. पुढे पक्षाने त्यांची महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक शिक्षकेतर सेनेच्या प्रदेश सचिव पदावर आणि महाराष्ट नवनिर्माण कामगार सेनेच्या प्रदेश उपाध्यक्ष पदावरही नियुक्ती केली होती. दोन वर्षांपूर्वी मनसेच्या शॅडोकॅबिनेटमध्ये वन, पर्यावरण मंत्री पदावर नियुक्ती केली होती. सर्व पदांचा राजीनामा देत दामले यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

Aditya Thackeray
मोदी साहेबांच्या कृपेने पेट्रोल लवकरच 150 रुपये प्रतिलिटर होईल : जयंत पाटलांचा टोमणा

दरम्यान, मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी शिवसेनेला लक्ष्य केले होते. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर दोनच दिवसात शिवसेनेने मनसेला चोख प्रत्युतर दिले आहे. त्यामुळे पुढील काळात शिवसेना आणि मनसे यांच्यात राजकारण रंगणार असल्याचे सांगितले जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com