Nagpur News : राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पक्षविस्तार मेळावा यवतमाळमध्ये पार पडला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षातील पदाधिकार्यांना कानपिचक्या दिल्या. येत्या काळात आता जुना-नवा वाद न घालता पक्षविस्तार महत्त्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले.
स्थानिक पोस्टल मैदान येथे आयोजित मेळाव्याप्रसंगी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रवीण देशमुख यांच्या पक्षप्रवेश सोहळा पार पडला. आपली सत्ता आहे, यामुळे कामे करा. स्थानिक कामे दर्जेदार व्हावी, यावर लक्ष ठेवा. संघटना वाढत असल्याने शिस्त आवश्यक असून जुना-नवा वाद न करता संघटना वाढवा, असा सल्ला अजित पवार यांनी पदाधिकाऱ्यांना दिला.
पक्षात नव्याने येणाऱ्या पदाधिकार्यांचा मानसन्मान राखला जाईल. नवे-जुने पदाधिकार्यांचा मेळ घालून नव्याने पक्षबांधणीचे संकेतही त्यांनी दिले. आता थांबू नका, पक्षवाढीसाठी दौरे करा, लोकांची कामे करा, त्यांच्या अडीअडचणी सोडवा, सर्वाचा आदर करा, अशा शब्दांत पदाधिकार्!यांना सूचना दिल्या. आज वेळ कमी असल्याने काही पदाधिकार्यांच्या घरी जाता आले नाही, यामुळे कुणी नाराज होऊ नका. नाराजीत काही बोलू नका, संयमाने काम करा, पुढच्या वेळी नक्कीच घरी येईल, असे म्हणत वाद न घालण्याचा सल्लाही नाराज पदाधिकार्यांना त्यांनी दिला.
निधी वाटपात दुजाभाव होऊ दिला जाणार नाही. यासाठी पालकमंत्री संजय राठोड, राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांची बैठक घेणार असल्याचे पवार म्हणाले. प्रवीण देशमुख यांनी केलेल्या मागणीच्या अनुषंगाने अजित पवार (Ajit Pawar) यांनी बेंबळाच्या उपवितरीकेतून शेवटच्या शेतकर्यांना पाणी कसे मिळेल, याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल. कळंब तालुका क्रिडा संकुलाचा प्रश्नही लवकरच सोडविला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
इंद्रनील नाईकांना समज
पक्षसंटन वाढविण्यासाठी नाईक परिवाराची भूमिका जिल्ह्यात महत्त्वाची होती. यामुळे नाईक परिवाराबद्दल नागरिकांच्या मनात प्रेम, आदर आहे. तोच वारसा इंद्रनील यांनी पुढे चालवावा. तुम्ही तरुण आहात, मंत्री आहात. यामुळे दौरे करुन पक्षाचे काम करा, सर्वांचा आदर करा, अशा शब्दांत अजितदादांनी राज्यमंत्री इंद्रनील नाईक (Indraneel Naik) यांचे कान टोचले.
राजकारणात जी पदे मिळाली ती अजितदादा मुळेच मिळाली आहे. यानंतरही काही कारणामुळे पक्ष सोडावा लागला. आता पुन्हा दादासोबत काम करण्याची संधी मिळाली आहे. आता कोणतीही मागणी न ठेवता दादांच्या नेतृत्वात काम करणार असल्याचे यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रवीण देशमुख यांनी स्पष्ट केले.
या कार्यकर्ता मेळाव्यास राज्यमंत्री इंद्रनील नाईक, आमदार संजय खोडके, अमोल मिटकरी, प्रदेश उपाध्यक्ष वसंतराव घुईखेडकर, प्रवीण देशमुख, अरुण राऊत, क्रांती धोटे राऊत, नाना गाडबैले, अशोक घारफळकर, जिल्हाध्यक्ष क्रांती कामारकर, माजी नगरसेवक दिनेश गोगरकर, विवेक देशमुख, लालजी राऊत, बोरी बाजार समितीचे सभापती विराज घुईखेडकर, योगेश धानोरकर, बाबू पाटील वानखडे, साहेबराव जुनघरे आदी उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.