Vidharbha Politic's : फडणवीसांच्या बालेकिल्ल्यात अजितदादांच्या राष्ट्रवादीचा शड्डू; ‘नागपूरमध्ये 40 जागा सोडा; अन्यथा...’

Nagpur Corporation Election : महापालिकेची निवडणूक ही कार्यकर्त्यांची असते. आता कोणीही ऐकण्याच्या मानसिकतेत नाही. आम्ही मागायच्या म्हणून जागा मागत नाही. 151पैकी फक्त 40 जागांवर आम्ही दावा करीत आहोत. त्या महायुतीच्या नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेससाठी सोडाव्यात अशी आमची विनंती आहे.
NCP-Ajit Pawar
NCP-Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Nagpur, 08 May : सर्वोच्च न्यायालयाने महापालिकेची निवडणूक चार महिन्यांच्या आत घेण्याचे निर्देश दिल्याने सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. भाजपच्या काही नेत्यांनी नागपूर महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढणार असल्याची परस्पर घोषणा केली आहे. त्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसने तडकाफडकी पक्षाची बैठक घेऊन ४० जागांवर कुठल्याही परिस्थितीत लढणारच, असा एकमताने ठराव केला. हे बघता जागा वाटपावरून महायुतीमध्ये संघर्ष होणार असल्याचे निश्चित झाले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) शहराध्यक्ष आणि विदर्भाचे प्रवक्ते प्रशांत पवार यांच्या नेतृत्वात आज बैठक घेण्यात आली. यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या भावना जाणून घेण्यात आल्या. कुठल्या प्रभागांमध्ये लढल्यास जिंकण्याची शक्यता आहे, राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद कुठे कुठे आहे याची माहिती घेण्यात आली. चर्चेअंती 40 जागांवर निवडणूक लढण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर एकमताने ठराव करून राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि विदर्भाचे संपर्क नेते राजू जैन यांना पाठवण्यात येणार आहे.

लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार केला. यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही समावेश आहे. नागपूरमध्ये (Nagpur) आम्ही दोन जागांची मागणी केली होती. त्या दिल्या नाहीत. त्यानंतरही सर्व नाराजी झटकून आम्ही प्रामाणिकपणे प्रचार केला. त्यापूर्वी काँग्रेस सोबत आघाडीत असतानाही राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना फक्त प्रचारासाठी वापरण्यात आले.

NCP-Ajit Pawar
NCP NEWS : राष्ट्रवादीच्या ऐकीच्या चर्चेवर भाजपची प्रतिक्रिया; ‘महाराष्ट्र हिताचा निर्णय अजितदादा अन्‌ सुप्रिया सुळे यांनी घ्यायचाय...’

महापालिकेची निवडणूक ही कार्यकर्त्यांची असते. आता कोणीही ऐकण्याच्या मानसिकतेत नाही. आम्ही मागायच्या म्हणून जागा मागत नाही. १५१ पैकी फक्त ४० जागांवर आम्ही दावा करीत आहोत. त्या महायुतीच्या नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेससाठी सोडाव्यात अशी आमची विनंती आहे.

NCP-Ajit Pawar
Uttam Jankar : निवडणुकीत कोब्रा, फितूर म्हणणाऱ्या उत्तम जानकरांना अजितदादांची भूरळ; सत्तेच्या मायाजालामुळे केले तोंड भरून कौतुक!

या संदर्भात अजित पवार आणि प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यासोबत आम्ही चर्चा करणार आहोत. ते भाजपच्या नेत्यांसोबत बोलतील. मात्र यात काहीही निर्णय झाला तरी आमचे कार्यकर्ते लढतीलच, असे सांगून प्रशांत पवार यांनी प्रसंगी बंडाचे निशान फडकवायला मागे पुढे पाहणार नाही, असाही इशारा दिला. आमच्या उमेदवारांच्या पाठीशी राष्ट्रवादी काँग्रेसची संपूर्ण टीम उभी राहील, असेही पवार यांनी ठामपणे सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com