Nagpur Mahayuti News : नागपूर महापालिकेसाठी भाजपचे एकला चलो.., तर राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही सूचक इशारा!

Nagpur NCP Politics : राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अन् विदर्भाचे प्रवक्ते प्रशांत पवार यांनी भाजपला टोला लगावला आहे, जाणून घ्या काय म्हटले आहे?
BJP and NCP
BJP and NCPSarkarnama
Published on
Updated on

BJP’s Ekla Chalo Stand in Nagpur Civic Polls : महापालिकेची निवडणूक घेण्याचे सर्वेच्च न्यायालयाने आदेश देताच महायुतीमध्ये स्वबळावरून वादची ठिगणी पडायला लागली आहे. भाजपच्या नेत्यांनी एकला चलोची भूमिका जाहीर केली आहे, त्यामुळे महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांनीसुद्धा भाजपला निवडणुकीतच याचे उत्तर देण्याचे ठरवले आहे.

भाजपचे पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे यांनी भाजप निवडणुकीसाठी सज्ज असून स्वबळावर निवडणूक लढणार असल्याचे जाहीर करून टाकले आहे. त्यामुळे वादाला तोंड फुटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आणि विदर्भाचे प्रवक्ते प्रशांत पवार यांनी भाजपच्या निर्णयाने आम्हाला काही फरक पडत नाही, आमच्याकडे सक्षम उमेदवार आहेत असे सांगून आमचेही तब्बल ५० उमेदवार भाजपचा सामना करण्यासाठी सज्ज असल्याचे सांगितले.

BJP and NCP
Narendra Modi hint Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'चा चार तास आधीच खुद्द मोदींनी दिला होता संकेत; कुणालाच आला नाही लक्षात!

महायुतीची सत्ता स्थापन झाल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महायुती करण्याचे अधिकार स्थानिक नेत्यांना दिले जाणार असल्याचे स्पष्ट केले होते. यात वरिष्ठ नेते हस्तक्षेप करणार नाही असे सांगून त्यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना मोकळीक दिली होती. तेव्हाच महापालिकेच्या निवडणुकीत महायुती होणार नाही याचा अंदाज आम्हाला आला होता. याकरिता आम्ही स्वतंत्रपणे आपली यंत्रण राबवणे सुरू केले होते. मध्य नागपूर, उत्तर नागपूर, पश्चिम तसेच पूर्व नागपूरमध्ये महापालिका निवडणुकीसाठी उमेदवार तयार केले आहे. दीडशेपैकी किमान पन्नास जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस फोकस करणार असल्याचे प्रशांत पवार यांनी सांगितले.

BJP and NCP
Operation Sindoor : ‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर आता भारताचं पुढचं पाऊल कोणतं? ; पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा!

राष्ट्रवादी काँग्रेसकडे गमावण्यसारखे काही नाही. आमच्या उमेदवारांचा फटका भाजपला बसण्याची शक्यता अधिक आहे याकडेही प्रशांत पवार यांनी लक्ष वेधले. उपमुख्यमंत्री अजित पवार महायुतीत सहभागी झाल्यानंतर लोकसभेच्या निवडणुकीत आमच्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे भाजपच्या उमेदवाराचे काम केले. विधानसभेच्या निवडणुकीत आम्ही नागपूर आणि ग्रामीणमध्ये प्रत्येकी दोन जागांवर दावा केला होता. भाजपच्या आग्रहाखातर अजित पवार यांनी नमते घेतले होते. याचा अर्थ महापालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक लढणार नाही असा होत नाही असा इशारा त्यांनी भाजपच्या नेत्यांना दिला.

BJP and NCP
Rashid Alvi on Operation Sindoor : ‘’मसूद अजहर मारला गेला का, हाफिज सईद जिवंत तर नाही? , पुन्हा पहलगाम..’’

तसेच, भाजप मोठा पक्ष आहे. त्यांचे १०८ नगरसेवक निवडून आले होते. हा आता इतिहास झाला. पाच वर्षे महापालिकेत भाजपची सत्ता होती. यापैकी भाजपचे किती नगरसेवक घराबाहेर पडले, किती लोकांनी मतदारांशी संपर्क ठेवला, कोणी काय कामे केली याचा सर्व हिशेब जनतेकडे आहे. भाजपचेचे नेतेच आमचे नगरसेवक निष्क्रय होते, त्यांना बदलवण्याची गरज असल्याचे सांगत आहेत. यावरून महापालिकेच्या निवडणुकीत भाजपची काय स्थिती राहील याचा अंदाज येतो, असे सांगून प्रशांत पवार यांनी भाजपला इशारा दिला.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com