Amravati Sexual Exploitation Case : परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणात पुराव्यांवर भर; एकीच्या धाडसी जबाबानं तपासाला वेग, ‘SIT’ सात पीडितांच्या नातेवाईकांच्या संपर्कात

In the Amravati Achalpur-Paratwada sexual exploitation case, one of eight victims records her statement before the SIT, marking a crucial step in the investigation : अमरावती परतवाडा लैंगिक अत्याचारप्रकरणात एसआयटी पुराव्यांवर भर देत असतानाच, आठ पीडितांपैकी एकीनेच पुढे येत जबाब नोंदवला आहे.
Amravati Sexual Exploitation Case
Amravati Sexual Exploitation CaseSarkarnama
Published on
Updated on

Achalpur Paratwada crime news : अमरावती परतवाडा इथल्या लैंगिक शोषण प्रकरणात अटक केलेल्या आठही संशयितांच्या घरांची झडती विशेष तपास पथकाने (एसआयटी) घेतली. तसेच पंचनामासुद्धा केला असल्याची माहिती पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांनी दिली. आठ दिवसांत एका पीडितेने ‘‘SIT’’च्या पथकासमोर जबाब देण्याचे धाडस दाखविले आहे.

परंतु तिच्या जबाबासंदर्भात यंत्रणा प्रचंड गोपनीयता बाळगण्यात आली आहे. गोपनीय पद्धतीने महिला तपास अधिकाऱ्यांसमोर अल्पवयीन पीडितेचा (वय 15) जबाब घेण्यात आला. परंतु त्याचा थेट संबंध अत्याचाराशी आहे की विनयभंगाच्या व्याख्येशी, याबाबत कोणत्याही प्रकारचे भाष्य करण्यास पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांनी नकार दिला.

अमरावती परतवाडा इथली ही घटना घडल्यानंतर सात दिवस कुणी पुढे येत नव्हते, एकीने धाडस दाखविले. त्यामुळे तांत्रिक पद्धतीचे पुरावे अधिक बळकट करण्याचा तपास यंत्रणेचा दृष्टिकोन दिसून येतो. 13 एप्रिलला काही अल्पवयीन मुलींचे व एका युवकाचे सोशल मीडियावरून (Social Media) आक्षेपार्ह फोटो व व्हिडिओ प्रसारित झाले. आतापर्यंत आठ पीडिता यात असल्याचे तपास यंत्रणेने सांगितले.

उर्वरित सात पीडितांच्या नातलगांशी यादरम्यान पोलिसांचा (Police) संपर्क सुरू असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. अयान अहमद तनवीर अहमद (वय 19, रा. परतवाडा) हा या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असून, उजेर खान इक्बाल खान याने अयानचे ‘व्हिडिओ’ घेऊन ते इतरांना पाठविले होते.

Amravati Sexual Exploitation Case
Paratwada exploitation case SIT : अमरावती परतवाडा सेक्स स्कँडल! 11 अधिकाऱ्यांसह 40 जणांची 'SIT' अ‍ॅक्शन मोडमध्ये; 4 अटकेत, 2 'रडार'वर, अत्याचारस्थळाचा पर्दाफाश

या दोघांव्यतिरिक्त साबीर (वय 22), तरबेज खान तसलीम खान (वय 24, तिन्ही रा. अचलपूर) यांना अचलपूर न्यायालयाने मंगळवारपर्यंत (ता. 21) पोलिस कोठडी सुनावली. अयानला मैत्रीण सोबत असताना फ्लॅटची खोली वापरण्यास देणारा संशयित मानव दीपक सुगंधे (वय 20, रा. आर्वी), ऐफाज खान मंजूर खान (वय 26), इमरान साजिद (वय 21), शेख नावेद शेख हसन (वय 21, तिघेही रा. अचलपूर) या चौघांना गुरुवारपर्यंत (ता.23) पोलिस कोठडी सुनावली आहे.

Amravati Sexual Exploitation Case
Obscene Video Viral Case : अमरावती हादरली! मुस्लिम युवकांकडून 180 युवतींचं लैगिंक शोषण, 350 व्हिडिओ व्हायरल, भाजप खासदाराची थेट अधीक्षकांकडे तक्रार

या आठही जणांच्या घराची झडती पोलिसांनी घेतली. परंतु त्यात त्यांना अतिरिक्त काय हाती लागले, याबाबतचे स्पष्टीकरण देण्यास पोलिसांनी नकार दिलेला आहे. पण ‘SIT’ या प्रकरण भक्कम तांत्रिक पुरावे गोळा करण्यावर भर देताना दिसत आहे.

आणखी दहा जणांची चौकशी

या प्रकरणात अन्य दहा जणांची पोलिसांनी चौकशी केली, त्यापैकी काहींना दोन तीन वेळासुद्धा पोलिसांनी काही बाबींची माहिती देण्याकरिता बोलविले. परंतु त्या दहा जणांची केवळ चौकशी झाली असून, त्यांना अटक केलेली नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com