अमोल काळे म्हणाले; पळून गेलो नाही, आरोप करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करतोय…

शिवसेना (Shivsena) नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी महाआयटीच्या कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्यात अमोल काळे (Amol Kale) यांचे नाव घेतले.
Amol Kale on Sanjay Raut
Amol Kale on Sanjay RautSarkarnama
Published on: 
Updated on: 

नागपूर : शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी महाआयटीच्या कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्यात (Scam) अमोल काळे यांचे नाव घेतले. त्यानंतर अमोल काळे विदेशात पळून गेले, अशी माहिती पसरविली जात आहे. त्याला अमोल काळे यांनी स्वतः उत्तर दिले आहे. ते म्हणतात, मी कुठेही पळून गेलेलो नाही, परदेशात जाण्याचा तर प्रश्‍नच निर्माण होत नाही. माझ्यावर आरोप करणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करतो आहे.

गेल्या दोन दिवसांपासून अमोल काळे यांच्यावर विविध राजकीय नेते (Political Leaders) आरोप करीत आहेत. त्यानंतर आज अमोल काळे (Amol Kale) यांनी निवेदन जाहीर केलंय. यामध्ये ते म्हणतात, ‘मी एक खासगी व्यावसायिक तसेच मुंबई (Mumbai) क्रिकेट असोसिएशनचा उपाध्यक्ष आहे. गे दोन दिवस तसेच आज सकाळी विविध वृत्तवाहिन्यांवर तसेच समाजमाध्यमांवर काही नेत्यांचे माझ्यासंदर्भातील वक्तव्ये पाहण्यात, वाचण्यात आली. ही सारी वक्तव्ये पूर्णतः दिशाभूल करणारी आणी माझी बदनामी करणारी आहेत. महाराष्ट्र शासनाचे (Maharashtra Government) कुठलेही कंत्राट, टेंडर मी घेतलेले नाही. (Amol Kale Reply to Sanjay Raut)

माझ्या खासगी व्यवसायाचे संपूर्ण तपशील माझ्या प्राप्तिकर विवरणात नमूद केले आहेत. असे असतानासुद्धा केवळ संभ्रम निर्माण करण्यासाठी माझी हेतुपुरस्सर बदनामी जे नेते करताहेत, त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई मी प्रारंभ करतो आहे. त्यामुळे मी कुठेही परदेशात जाण्याचा प्रश्‍नच निर्माण होत नाही.’ अमोल काळे यांनी जाहीर निवेदनातून आज त्यांची बाजू स्पष्ट केल्यानंतर हे प्रकरण कोणते वळण घेईल, याची चर्चा सुरू झाली आहे. आज अमोल काळे समोर आल्यानंतर खासदार राऊत काय प्रतिक्रिया देतात, याकडेही जनतेचे लक्ष लागले आहे. (Amol Kale News)

Amol Kale on Sanjay Raut
सर्वोच्च न्यायालयाचा भाजप सरकारला दिलासा; स्थानिकांना नोकऱ्यांत 75 टक्के आरक्षण

काय म्हणाले होते संजय राऊत ?

अमोल काळेंचे काय व्यवहार आहेत, ते समोर आले पाहिजे. नाहीतर आम्ही त्यांना समोर आणू, असे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर अमोल काळे रातोरात चर्चेत आले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत त्यांचा संबंध जोडला जात आहे. महाआयटीमध्ये २५ हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. अमोल काळे यांच्या माध्यमातून संजय राऊत यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केल्याचे बोलले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

Akot Gambling Raid | 22 Gamblers Arrested | Police Action
BJP Leader : भाजपमधून सहा वर्षांसाठी हकालपट्टी केलेले नेते मुख्यमंत्र्यांसोबत; फोटो व्हायरल, विधानपरिषदेच्या निवडणुकीमध्ये केली होती बंडखोरी
chandrashekhar bawankule, balvant wankhede
Nitin Gadkari on Gokul Milk