Amravati Mayor : भाजपच्या महापौरपदाची फिल्डिंग लागली पण, रवी राणांचं गणित फसणार? सुलभा खोडकेंच्या एका विधानानं वाढला उपमहापौरपदाचा सस्पेन्स

Amravati Political News : अमरावती महापालिकेतील महायुतीत राष्ट्रवादीच्या भूमिकेमुळे संभ्रम निर्माण झाला असून, महापौरपदापुरती युती असल्याच्या विधानाने राजकीय चर्चांना वेग आला आहे.
NCP leaders attending mayoral nomination in Amravati Municipal Corporation, triggering political debate over Mahayuti coordination and power-sharing formula.
NCP leaders attending mayoral nomination in Amravati Municipal Corporation, triggering political debate over Mahayuti coordination and power-sharing formula.Sarkarnama
Published on
Updated on

Amravati Municipal Corporation : अमरावती महायुतीत सहभागी राष्ट्रवादीने महापौरपदासाठी नामांकन दाखल करताना उपस्थिती लावली असली तरी उपमहापौरांच्या नामांकनावर घेतलेल्या भूमिकेमुळे राजकीय वर्तूळाच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत. आमची युती महापौरासाठी असल्याचे नामांकन दाखल करताना करण्यात आलेल्या विधानामुळे सहा फेब्रुवारीस काही चमत्कार घडेल का? यावर राजकीय चर्चेला उधाण आलेले आहे. दरम्यान, यावर अद्याप या पक्षाच्या नेत्यांकडून अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही.

महापालिकेत सत्ता स्थापनेत अखेरच्या टप्प्यात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) भाजपसोबत युतीत सहभागी झाली आहे. मनपातील सत्ताकारणात तयार झालेल्या महायुतीत भाजपसोबत राष्ट्रवादी व युवा स्वाभिमान पक्ष सहभागी आहे. महापौरपद भाजपला व उपमहापौरपद युवा स्वाभिमानला देण्यात आले आहे. दोन्ही पक्षांनी सव्वा-सव्वा वर्षाचा फार्म्युला तयार करीत दोन्ही टर्मच्या उमेदवारांची नावेही जाहीर केली आहेत. सत्ता वाटपात राष्ट्रवादीच्या वाट्यावर अद्याप कोणतेही पद आलेले नसून स्थायी समितीचे सभापतिपद देण्यात येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

दरम्यान, सोमवारी नामांकन दाखल करताना राष्ट्रवादीच्या आमदार सुलभा खोडके व या पक्षाचे नवनिर्वाचित सर्व अकराही सदस्य उपस्थित होते. महापौरपदासाठी भाजपकडून नामांकन दाखल झाल्यानंतर आमदार सुलभा खोडके निघून गेल्या. मात्र जाता जाता त्यांनी आमची उपस्थिती महापौरपदासाठीच्या नामांकनासाठी होती, असे विधान केल्याने राजकीय क्षेत्रात चर्चेला पेव फुटले आहे. तथापि त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आमचा विश्वास असल्याचेही स्पष्ट केले.

NCP leaders attending mayoral nomination in Amravati Municipal Corporation, triggering political debate over Mahayuti coordination and power-sharing formula.
Amravati Mahapalika : भल्या भल्यांना आस्मान दाखवणाऱ्या भाजपचाच ठरवून गेम; राणा दाम्पत्याने अमरावतीत डझनभर जागा पाडल्या!

महायुतीत सहभागी व्हावे, यासाठी आमदार संजय खोडके यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा झाली होती. भाजपचे आमदार संजय कुटे व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यासाठी मध्यस्थी केली आहे. स्व. अजितदादांसोबत या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांची चर्चा झाली होती व त्यामध्ये काय ठरले, हे मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याचे सांगतानाच आमदार संजय खोडके यांनी त्यावरूनच आम्ही युतीत सहभागी झाल्याचेही स्पष्ट केले आहे. तथापि युती महापौरपदासाठी आहे, असे आमदार सुलभा खोडके यांच्या विधानावरून राजकीय पेच अजून कायम असल्याचे दिसून येत आहे.

NCP leaders attending mayoral nomination in Amravati Municipal Corporation, triggering political debate over Mahayuti coordination and power-sharing formula.
Amravati Mayor Election 2026:अमरावतीत राणा जोडप्याचा भाजपकडून करेक्ट कार्यक्रम; महापौरपदाच्या निवडीत राष्ट्रवादी काँग्रेसची सोबत घेत चेकमेट

सहा फेब्रुवारीस दोन्ही पदांसाठी निवडणूक होत आहे. विद्यमान स्थितीत महापालिकेतील महायुतीकडे 51 चे संख्याबळ आहे. बहूमतासाठी 44 ची गरज आहे. राष्ट्रवादीने (NCP) ऐनवेळी उपमहापौरास मतदान करण्यास नकार दिल्यास पेच निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे. राज्याच्या सत्तेत असलेल्या शिवसेनेच्या शिंदे गटाने अद्याप भूमिका स्पष्ट केलेली नाही, तर बसपाने नामांकन दाखल केले आहे. उबाठा, वंचितची भूमिकाही स्पष्ट नाही. एमआयएम तटस्थ राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com