Amravati Municipal Corporation

अमरावती ही नागपूरनंतर विदर्भातील दुसरी महत्त्वाची महानगरपालिका आहे. भाजप, काँग्रेस, शिवसेना यासह युवा स्वाभिमान पक्षाचे इथे प्राबल्य आहे. 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत अमरावती महापालिकेवर भाजपने निर्विवाद वर्चस्व मिळवले होते. 87 पैकी 45 जागांवर विजय मिळवत भाजपने एकहाती सत्ता स्थापन केली होती. तर 15 जागांसह काँग्रेस दुसऱ्या स्थानी राहिली होती. शिवसेनेने 7 आणि युवा स्वाभिमान पक्षाचे 3 नगरसेवक निवडून आले होते. यावेळी भाजप आणि युवा स्वाभिमान पक्षाची युती होऊ शकते. त्यामुळे काँग्रेससमोर मोठे आव्हान असणार आहे.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com