

CBSE latest news : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE) कारभारावर देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. ऑन स्क्रीन मार्किंग (OSM) प्रणालीचालाखो विद्यार्थ्यांना फटका बसला आहे. अनेक तांत्रिक समस्यांना विद्यार्थ्यांना भेडसावत असल्याने सरकारविरोधातील रोष वाढत चालला आहे.
विरोधी पक्षातील नेत्यांसह सोशल मीडियात लोकप्रिय झालेल्या कॉक्रोच जनता पार्टीकडूनही केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. सीजेपीने ६ जूनही त्यांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत आंदोलनाची घोषणा केली आहे. यापार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मंगळवारी सीबीएसईमध्ये पहिली मोठी कारवाई केली आहे.
सरकारने सीबीएसईचे अध्यक्ष आणि सचिवांची बदली केली आहे. सीबीएसई परीक्षांचे व्यवस्थापन, गुणांकन प्रक्रियेतील महाघोळ, टेंडर प्रक्रियेवर झालेले आरोप, अनेक तांत्रिक अडचणींच्या पार्श्वभूमीवर सरकारचा हा निर्णय महत्वपूर्ण मानला जात आहे. एकप्रकारे सरकारने या दोन अधिकाऱ्यांना जबाबदार धरत त्यांच्यावर ठपका ठेवल्याचे मानले जात आहे.
प्रामुख्याने सीबीएसईच्या ओएसएम पध्दतीवर विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतला आहे. इयत्ता बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांनी मिळालेल्या गुणांवर नाराजी व्यक्त केली. काही विद्यार्थ्यांनी तर टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली. सोशल मीडियात तक्रारींची लाट आली. त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य वाढले. अखेर शिक्षण मंत्र्यांनीही तांत्रिक घोळ मान्य करत त्याची चौकशी सुरू केली.
एवढेच नाही तर विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकांचे पुनर्मूल्यांकनासाठी संकेतस्थळावर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. मात्र, संकेतस्थळही क्रॅश झाले. चार दिवस बंद ठेवल्यानंतर ते मंगळवारी पुन्हा सुरू करण्यात आले. पण त्यानंतरही विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागला. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सीबीएसईचे अध्यक्ष राहुल सिंह आणि सचिव हिमांशु गुप्ता यांची बदली करण्यात आली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.