Ravi Rana targets Wankhade : अमरावतीच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा; खासदार शोधून देणाऱ्यास बक्षीस देण्याचे मेळघाटात लागले फलक; वानखडे विरुद्ध राणा संघर्ष पेटणार!

Ravi Rana targets Amravati MP Balwant Wankhade News : खासदार वानखेडे यांच्या कार्यशैलीवर टीका करताना गेल्या अडीच वर्षांपासून खासदार अनुपस्थित आणि निष्क्रिय असल्याचे आरोप केले आहेत.
Ravi rana, Navneet Rana, balvant wankhde
Ravi rana, Navneet Rana, balvant wankhde sarkarnama
Published on: 
Updated on: 

Amravati News : अमरावती लोकसभा निवडणुकीला अद्याप अडीच वर्षाचा अवधी आहे. त्यापूर्वीच वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. भाजप व काँग्रेस नेत्याकडून गेल्या चार दिवसापासून सातत्याने एकमेकांवर टीका टिपण्णी केली जात असल्याने राजकारण ढवळून निघाले आहे. भाजपच्या नेत्या नवनीत राणा व आमदार रवी राणा यांनी अमरावतीचे खासदार बळवंत वानखेडे यांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत जोरदार टीका केली.

खासदारांचा पत्ता शोधण्यासाठी नागरिकांनी खासदार शोधा आणि बक्षीस मिळवा असे फलक मेळघाटातील धारणी आणि चिखलदरा तालुक्यांमध्ये लावले असल्याचे राणा यांनी नमूद केले. त्यामुळे आता येत्या काळात वातावरण तापणार असून या आरोपांना खासदार वानखेडे कशा प्रकारे उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आमदार रवी राणा (Ravi rana) यांनी खासदार बळवंत वानखेडे यांच्या कार्यशैलीवर टीका करताना गेल्या अडीच वर्षांपासून खासदार अनुपस्थित आणि निष्क्रिय असल्याचे आरोप केले आहेत. खासदारांचा पत्ता शोधण्यासाठी लोकांनी खासदार शोधा आणि बक्षीस मिळवा असे फलक मेळघाटातील धारणी आणि चिखलदरा तालुक्यांमध्ये लावले आहेत. तर राणा यांनी अमरावती जिल्ह्याला प्रथमच असे पालकमंत्री लाभले आहेत जे गोरगरीब, आदिवासी आणि सर्वसामान्य जनतेत जाऊन दिवाळी साजरी करतात, असे स्पष्ट करीत पालकमंत्र्याचे कोतुक केले आहे.

राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar bawankule) हे महिन्यातून चार ते पाच वेळा जिल्ह्यात येतात. प्रत्येक प्रश्नाकडे लक्ष देतात आणि विकासासाठी मदत करतात. बावनकुळे हे विकासाचे महामेरू असून त्यांनी जनतेच्या हृदयात स्थान निर्माण केले आहे, असे कौतुक राणा यांनी केले. याउलट, अमरावतीचे खासदार वानखेडे पूर्णपणे अयशस्वी ठरले आहेत. त्यांची कारकीर्द निष्क्रिय ठरली असून, त्यांनी एकही विकासकाम केले नाही, अशी जनतेची भावना असल्याचे राणा यांनी सांगितले.

Ravi rana, Navneet Rana, balvant wankhde
Ravi Rana Minister : 'पुढच्या वर्षी मंत्री म्हणूनच येणार!' रवी राणांचा नरकासुर दहनात मोठा दावा; म्हणाले, 'नेत्याने शब्द दिलाय'

दरम्यान, चार दिवसापूर्वीच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी 2029 मध्ये निष्क्रिय लोकांना घरी पाठवून नवनीत राणा यांना पुन्हा या लोकसभेमध्ये बहुमताने विजय करणार असल्याचा दावा केला. त्याला खासदार वानखडेंनी जोरदार प्रत्युत्तर दिले.

लोकसभा निवडणुकीत राणांनी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा अपमान केला होता, त्यामुळे माझ्यावर मनापासून बावनकुळे यांनी टीका केली असे मला वाटत नाही. हा राग अजूनही बावनकुळे यांच्या जिव्हारी लागलेला असून, त्यांनी केलेल्या टीकेला काहीही अर्थ नाही, अशा शब्दांत वानखडे यांनी पलटवार केला होता.

Ravi rana, Navneet Rana, balvant wankhde
Amravati Politics : विधानपरिषद संपताच अमरावतीत लोकसभा निवडणुकीचं बिगूल वाजलं : बावनकुळेंनी नवनीत राणांच्या विजयासाठी दंड थोपटताच खासदार वानखडेंचा पलटवार

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

navneet rana, pravin pote patil
chandrashekhar bawankule, balvant wankhede
Ravi Rana
Amravati Teachers Constituency