Amravati Politics : विधानपरिषद संपताच अमरावतीत लोकसभा निवडणुकीचं बिगूल वाजलं : बावनकुळेंनी नवनीत राणांच्या विजयासाठी दंड थोपटताच खासदार वानखडेंचा पलटवार

Balwant Wankhade responds to Bawankule's News : लोकसभा निवडणुकीत राणांनी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा अपमान केला होता, त्यामुळे माझ्यावर मनापासून बावनकुळे यांनी टीका केली असे मला वाटत नाही.
chandrashekhar bawankule, balvant wankhede
chandrashekhar bawankule, balvant wankhedeSarkarnama
Published on: 
Updated on: 

Amravati News : लोकसभा निवडणुकीला अद्याप दोन ते अडीच वर्षाचा कालावधी शिल्लक राहिला आहे. मात्र, निवडणुका जवळ येण्यापूर्वीच सत्ताधारी व विरोधकांकडून एकमेकांवर टीका केली जात असल्याने वातावरण चांगलेच तापले आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी 2029 मध्ये निष्क्रिय लोकांना घरी पाठवून नवनीत राणा यांना पुन्हा या लोकसभेमध्ये बहुमताने विजय करणार असल्याचा दावा केला. त्याला खासदार वानखडेंनी जोरदार प्रत्युत्तर दिले. लोकसभा निवडणुकीत राणांनी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा अपमान केला होता, त्यामुळे माझ्यावर मनापासून बावनकुळे यांनी टीका केली असे मला वाटत नाही. हा राग अजूनही बावनकुळे यांच्या जिव्हारी लागलेला असून, त्यांनी केलेल्या टीकेला काहीही अर्थ नाही, अशा शब्दांत वानखडे यांनी पलटवार केला.

महसूलमंत्री बावनकुळे यांनी केलेल्या टीकेला अमरावतीच्या काँग्रेसचे खासदार बळवंत वानखडे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. विशेष म्हणजे, अमरावती जिल्ह्याला आजपर्यंत मिळालेले सर्वात निष्क्रिय पालकमंत्री म्हणून चंद्रशेखर बावनकुळेच आहेत, असा गंभीर आरोप करत त्यांनी चंद्रशेखर बावनकुळेंना आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला दिला आहे. 2029 च्या निवडणुकांच्या दाव्यांवर बोलताना, कोणाला घरी पाठवायचे आणि कोणाला निवडून द्यायचे हे जनता ठरवेल, जनता माझ्या पाठीशी आहे, असे सांगत खासदार वानखडे यांनी थेट भाजपला आव्हान दिले.

लोकसभा निवडणुकीत नवनीत राणांनी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा अपमान केला होता, त्यामुळे माझ्यावर मनापासून बावनकुळे यांनी टीका केली असे मला वाटत नाही. त्यांनी केलेल्या टीकेला काहीही अर्थ नाही, अशा शब्दांत वानखडे यांनी पलटवार केला.

chandrashekhar bawankule, balvant wankhede
भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर नेत्यांना नेमका काय फायदा होतो? निवडणुकीपासून सत्तेपर्यंतचं गणित

दरम्यान, अमरावती लोकसभा मतदारसंघाची जागा भाजप ही जिंकल्याशिवाय राहणार नाही. जे लोक समाजाच्या शेवटच्या घटकाला न्याय देऊ शकत नाहीत अशा निष्क्रिय लोकांना घरी पाठवले पाहिजे. अशा लोकांना पदावर राहण्याचा अधिकार नाही, अशी नाव न घेता पालकमंत्री बावनकुळे यांनी अमरावतीचे खासदार बळवंत वानखडे यांच्यावर टीका केली.

chandrashekhar bawankule, balvant wankhede
NCP Merger: राष्ट्रवादीच्या विलीनीकरणात सुनील तटकरेंना खलनायक ठरवू नका! अदिती तटकरे यांची टीकाकारांना चपराक

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.