Amravati News : ठाकरेंच्या आमदारांचा तहसीलदारांच्या खुर्चीवर बसून कारभार! भाजपची राज्यपालांकडे थेट आमदारकी रद्दसाठी तक्रार

Amravati News : Shiv Sena (UBT) MLA Gajanan Lawate : अंजनगाव सुर्जी तहसील कार्यालयातील आढावा बैठकीत आमदार गजानन लवाटे तहसीलदारांच्या खुर्चीत बसल्याचे फोटो समोर; प्रशासकीय शिष्टाचाराच्या उल्लंघनाचा आरोप करत भाजपची आक्रमक भूमिका, राज्यपालांकडे लेखी तक्रार
Gajanan Lawate
Gajanan LawateSarkarnama
Published on: 
Updated on: 

BJP Complaint Against Gajanan Lawate : अमरावतीच्या अंजनगाव सुर्जीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे आमदार गजानन लवाटे यांनी तहसीलदार तथा तालुका दंडाधिकाऱ्यांच्या खुर्चीवर बसून आढावा बैठक घेतल्याने, वादात सापडले आहे.

आमदार लवाटे यांच्या या कार्यपद्धतीवर भाजपने जोरदार आक्षेप घेतला आहे. राज्यपालांकडे तक्रार करत, गजानन लवाटे यांची विधानसभा सदस्यत्व रद्द करण्याची कारवाई करावी, अशी तक्रार केली आहे.

अंजनगाव सुर्जी तहसील कार्यालया गुरूवारी (ता. 19) आढावा बैठक झाली. दर्यापूर विधानसभा मतदारसंघाचे शिवसेवा उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे (Shivsena UBT) आमदार गजानन लवाटे या बैठकीत सहभागी झाले होते. त्यांनी विविध विभागांचा आणि कामांचा आढावा घेतला. पण हा आढावा तहसीलदार तथा तालुका दंडाधिकाऱ्यांच्या खुर्चीत बसून घेतला. तसे फोटो समोर आल्याने, आमदार लवाटे यांनी प्रशासकीय शिष्टाचार पाळला नसल्याची तक्रार झाली आहे.

आमदार लवाटे यांच्या कृतीवर भाजप (BJP) चांगलीच आक्रमक झाली आहे. भाजपच्या अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष नकुल सोनटक्के यांनी आमदार लवाटे यांच्या या कृतीवर थेट राज्यपाल जिष्णु देव शर्मा यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. लोकप्रतिनिधींना जनतेचे प्रश्न मांडण्याचा अधिकार असला, तरी शासकीय अधिकाऱ्यांच्या वैधानिक पदाची प्रतिष्ठा, प्रशासकीय शिष्टाचार व अधिकारांचा आदर करणे अपेक्षित आहे. सदर प्रकारामुळे प्रशासकीय मर्यादांचे उल्लंघन झाले आहे काय, याची सखोल चौकशी व्हावी, असे नकुल सोनटक्के यांनी तक्रारीत म्हटले आहे.

Gajanan Lawate
Suresh Dhas Audio Clip : 'त्याचे हातपाय मोडतील, तुझा नंबर लागू नये!' सुरेश धस यांच्या आवाजाची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल; बीडमध्ये खळबळ

राज्यपाल यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन संबंधित तहसील कार्यालयाचे सीसीटीव्ही फुटेज, छायाचित्रे व उपस्थित अधिकाऱ्यांचे जबाब तपासून निष्पक्ष चौकशीचे निर्देश द्यावेत. चौकशीत पदाचा गैरवापर किंवा अन्य कायदेशीर उल्लंघन सिद्ध झाल्यास संबंधित कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 191 व 192 अन्वये अपात्रतेचा प्रश्न कायदेशीरदृष्ट्या उद्भवत असल्यास सक्षम प्राधिकरणामार्फत विधानसभा सदस्यत्व रद्द करण्याबाबत नियमानुसार कारवाई व्हावी, असे तक्रारीत म्हटले आहे.

Gajanan Lawate
Rahul Gandhi News : ट्रम्प-पुतिन-जिनपिंग एकाच टेबलावर, मोदी कुठे आहेत? राहुल गांधींचा 'तडजोडीचे पंतप्रधान' म्हणत घणाघात!

भाजपच्या या तक्रारीवर राज्यपाल काय निर्णय घेतात, याकडे आता लक्ष लागले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे आमदार गजानन लवाटे काय प्रतिक्रिया देतात, हे देखील पाहावे लागले. दरम्यान, भाजप अन् शिवसेना ठाकरे सेना पक्षात, यावरून राजकीय संघर्ष पेटण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.