Talathi Firing Conspiracy : तलाठ्याने स्वतःच्याच घरावर घडवून आणला गोळीबार : तपासात समोर आला धक्कादायक कट

talathi house firing conspiracy : महाराष्ट्रात तलाठ्याने स्वतःच्याच घरावर गोळीबार घडवून आणल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दीड लाखांची सुपारी देऊन रचलेला कट पोलिसांच्या तपासात उघड झाला.
Talathi Firing Conspiracy : तलाठ्याने स्वतःच्याच घरावर घडवून आणला गोळीबार : तपासात समोर आला धक्कादायक कट
sarkarnama
Published on
Updated on

talathi stages firing at his own house : अमरावतीमध्ये स्वतःच्याच घरावर गोळीबार घडवून आणून हत्येचा प्रयत्म केल्याच्या धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेचा पोलिसांनी अवघ्या २४ तासात छडा लावला असून या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या गोळीबारामागे घरातील व्यक्तीचाच सहभाग असल्याचे तपासातून समोर आले आहे. या प्रकरणात तलाठ्यानेच स्वचःच्या घरावर गोळीबार करण्यासाठी आरोपींना तब्बल दीड लाख रुपयांची सुपारी दिल्याचा आरोप आहे.

9 ऑगस्ट रोजी अमरावतीच्या अर्जुन नगर परिसरात तलाठी विपुल ठाकरे यांच्या घरावर अज्ञात व्यक्तींनी देशी कट्ट्यातून गोळीबार केल्याची माहिती डायल 112 वर पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच गाडगे नगर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि अमरावती शहर गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून गोळीबाराच्या घटनेचा तपास सुरू केला.

Talathi Firing Conspiracy : तलाठ्याने स्वतःच्याच घरावर घडवून आणला गोळीबार : तपासात समोर आला धक्कादायक कट
Teacher Recruitment: पवित्र पोर्टल पुन्हा स्लो! शिक्षक भरतीला मोठा फटका; OTP येईना, प्राधान्यक्रमही जनरेट होईना!

या प्रकरणाचा तपास करताना गुन्हे शाखेने परिसरातील तब्बल १०० हून अधिक ठिकाणांवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. या तपासातून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयित आरोपींचा माग काढला.

तपासादरम्यान वडाळी येथील बादशहासिंग अजबसिंग टांक, राजुरा येथील अजय नुरजेम भोसले, वडाळी येथील राजासिंग अजबसिंग टांक आणि चंद्रसिंग उर्फ शेरुसिंग जोधसिंग शाकला या 4 आरोपींना पोलिसांनी अटक केली.

पोलिसांच्या चौकशीत या प्रकरणाचा धक्कादायक खुलासा झाला. फिर्यादीचे पती आणि तलाठी असलेले विपुल ठाकरे यांनीच स्वतःच्या घरावर गोळीबार करण्यासाठी आरोपींना 1.50 लाख रुपयांची सुपारी दिल्याचे तपासात समोर आले आहे. या कटासाठी सुरुवातीला विपुल ठाकरे यांनी आरोपींना 10 हजार रुपये दिल्याची माहितीही पोलिस तपासात उघड झाली आहे.

Talathi Firing Conspiracy : तलाठ्याने स्वतःच्याच घरावर घडवून आणला गोळीबार : तपासात समोर आला धक्कादायक कट
Private Vehicle Rules : खासगी गाडीवर 'Police' लिहिलंय? गृहविभागाचा मोठा निर्णय, नियम मोडल्यास काय होणार?

दरम्यान, या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि तलाठी विपुल भानुदास ठाकरे सध्या फरार असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. स्वतःच्या घरावर गोळीबार घडवून आणण्यामागे नेमका काय उद्देश होता, याचा तपासही पोलिसांकडून सुरू आहे. अमरावती शहर गुन्हे पथकाने केलेल्या या कारवाईमुळे गोळीबाराच्या या कटाता अवघ्या 24 तासांत पर्दाफाश झाला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com