Anil Deshmukh : ‘हिट अँड रन' प्रकरणात अनिल देशमुखांचा देवेंद्र फडणवीसांवर निशाणा, 'सात तास रक्त...'

Nagpur Hit and Run Case Anil Deshmukh Devendra Fadnavis : ‘हिट अँड रन' प्रकरणात पुरावे नष्ट करण्यासाठी काय काय केले आणि पोलिसांची संशयास्पद कारवाईचे दाखले देत देशमुखांनी फडणवीसांवर हल्ला चढवला.
Anil Deshmukh Devendra Fadnavis
Anil Deshmukh Devendra Fadnavis sarkarnama
Published on
Updated on

Anil Deshmukh : ईडीचा जाच मागे लावला तेव्हापासून माजी गृहमंत्री अनिल देशमुख भाजपवर त्यातही उपमुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करण्याची एकही संधी सोडत नाही. आजही (गुरुवारी) विधानसभेत नागपूरमधील ‘हिट अँड रन'च्या घटनांचा उल्लेख करून देशमुखांनी फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.

रामझुला उड्डाणपुलावर झालेल्या हिट अँड रनच्या घटनेतील आरोपींना कसे वाचवण्याचे प्रयत्न केले जात आहे, पुरावे नष्ट करण्यासाठी काय काय केले आणि पोलिसांची संशयास्पद कारवाईचे दाखले देत देशमुखांनी फडणवीसांवर हल्ला चढवला.

रितिका मालू नावाच्या महिलेने बेदेरकार कार चालवून रामझुला उड्डाणपुवरून दुचाकीने जाणाऱ्या दोघांना उडवले होते. त्यात दोघांचाही मृत्यू झाला. मध्यरात्री दोन वाजता ही घटना घडली होती. त्यानंतर तब्बल सात तासाने त्या महिलेच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले. घटनास्थळावरून महिलेला जाऊ देण्यात आले. तिचे वडील येताच संबंधित ठाण्याच्या पोलिस निरीक्षकाने त्यांच्यासोबत गळाभेट घेतली. गाडीतील दारुच्या बाटल्या काढून घेतल्या. सुपूर्दनामा न करताच गाडीही परत केली, असे देशमुख Anil Deshmukh म्हणाले.

Anil Deshmukh Devendra Fadnavis
Maharashtra Monsoon Session : 'पुंडलिक वरदे हरी विठ्ठला'चा गजर करत अजित पवारांची वारकऱ्यांसाठी मोठी घोषणा

ममता आदमने यांना धडक देणाऱ्या चारचाकीच्या चालकास तब्बल 20 दिवसांनी नोटीस देऊन सोडून देण्यात आले. दिघोरी येथेली हिट अँड रन प्रकरणात तर पोलिसांनी कमालच केली. आरोपींचे रक्ताचे नमुन संबिधत पोलिस निरीक्षकाने तीन दिवस आपल्याच वाहनाच्या डिक्कीत ठेवले होते. पुरुषोत्तम पुट्टेवार यांना मालमत्तेसाठी मुलीनेच सुपारी देऊन कारने चिरडण्यात आले. नागपुरातील या सर्व घटना गंभीर आहेत. पोलिसांची भूमिकासुद्धा संशयास्पद असल्याचे सांगून अनिल देशमुख गृहखात्याच्या कारभारावरून देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांच्यावर निशाणा साधला.

महाविकास आघाडी सरकारमध्ये अनिल देशमुख गृहमंत्री होते. ईडीने अटक केल्यानंतर त्यांना गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. आपल्याला कसे फसवण्यात आले हे त्यांनी वारंवार सांगितले आहेत. एक वर्षे त्यांना तुरुंगात ठेवण्यात आले होते. मात्र ईडीला आरोपपत्र दाखल करता आले नाही. तेव्हापासून देशमुख संधी मिळेल तेव्हा भाजप आणि फडणवीस यांच्यावर तुटून पडतात.

(Edited By Roshan More)

Anil Deshmukh Devendra Fadnavis
Maharashtra Assembly Monsoon Session: मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेंतर्गत पात्र कुटुंबाना वर्षाला तीन सिलेंडर मोफत; अजित पवारांची मोठी घोषणा

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com