Video Anil Deshmukh : अनिल देशमुख यांचा काॅन्फिडन्स वाढला, म्हणाले, 'तीन महिन्यानंतर आमचेच सरकार'

Anil Deshmukh NCP : आमचे सरकार आल्यानंतर महायुती सरकारच्या दबावात नियमबाह्ये कामे करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे देशमुख म्हणाले.
Anil Deshmukh
Anil DeshmukhSarkarnama

Anil Deshmukh News : महायुती सरकारचे तीन महिने आता शिल्लक राहिले आहेत. विधानसभेच्या निवडणुकीनंतर आमचे सरकार येणार असल्याचे भाकीत राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी वर्तविले. यानंतर सरकारच्या दबाबात नियमबाह्ये कामे करणाऱ्यांचा हिशेब घेतला जाईल असेही ते म्हणाले.

आमचे सरकार आल्यानंतर महायुती सरकारच्या दबावात नियमबाह्ये कामे करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल. अशा अधिकाऱ्यांच्या याद्या आम्ही तयार करीत आहोत, असेही देशमुख म्हणाले.

भाजपने विधानसभेच्या 288 जागा लढवाव्या. त्यांच्या त्यांची ताकद कळेल. आम्ही लोकसभेच्या 35 जागा जिंकू असे सांगितले होते. 31 जागा महाविकास आघाडीच्या जिंकून आल्या. विधानसभेची निवडणूकसुद्धा महाविकास आघाडी एकत्रितच लढणार आहे. याची चिंता आता भाजपच्या नेत्यांनी करावी असेही देशमुख म्हणाले.

राज्याच्या मुख्यमंत्र्यांना Eknath Shinde कुठलेच अधिकार नाही. त्यांना दिल्ली दरबारी हजेरी लावावी लागते. प्रत्येक निर्णयाची माहिती द्यावी लागते आणि परवानगी घ्यावी लागते. महायुतीचे सरकार हतबल झाले आहे.

धनगर समाजाचे आंदोलन सुरू असताना देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते. पाच वर्षे ते मुख्यमंत्री होते. सध्या उपमुख्यमंत्री आहेत. मात्र आरक्षण देण्यात आले नाही. याची जाणीव धनगर समाजाला आहे.

Anil Deshmukh
Srirang Barane: खासदार बारणेंच्या मनात अजितदादांच्या राष्ट्रवादीबाबत 'ती' सल आजही कायम

'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई करा

पुण्यात वारंवार ड्रग्स प्रकरण घडत आहे. ललित पाटील प्रकरण ताजे असताना हॉटेल रेस्टॉरेंटमध्ये ड्रग विकले जात असल्याचे व्हिडिओ समोर आले आहेत. एक-दोन अधिकाऱ्यांना निलंबित करून चालणार नाही. जे अधिकारी यात दोषी आहे त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे.

कर्ज माफीची घोषणा करा

नागपूरच्या राम झुलावरील हिट अँड रन प्रकरणातील आरोपी रितिका मालू 130 दिवसांपासून फरार आहेत. तिला राजकीय संरक्षण असल्याची चर्चा आहे. तेलंगनामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आली आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही कर्जमाफी केली पाहिजे. येणाऱ्या विधिमंडळा अधिवेशनात शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा करावी, अशी मागणी अनिल देशमुख Anil Deshmukh यांनी केली.

(Edited By Roshan More)

Anil Deshmukh
Suryakanta Patil News : आधीच संकटात असलेल्या भाजपला सूर्यकांता पाटलांची नाराजी भोवणार?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com