BJP Vs Anil Deshmukh: अनिल देशमुखांना मोठा धक्का; भाजपनं कट्टर समर्थकालाच फोडलं

NCP Vidarbha Politics : विधानसभेच्या निवडणुकीत काटोल विधानसभा मतदारसंघातून सलील देशमुख यांना शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी दिली होती. या निवडणुकीत भाजपच्या चरणसिंग ठाकूर यांनी सलील देशमुख यांचा पराभव केला
Anil Deshmukh Devendra Fadnavis
Anil Deshmukh Devendra Fadnavis sarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : राज्याचे माजी गृहमंत्री व शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांचे एकेकाळचे कट्टर समर्थक आणि नागपूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष चंद्रशेखर चिखले यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. आपल्याला कोणी विचारत नाही, विश्वासात घेत नाही असे सांगून त्यांनी महिनाभरापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला होता. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत त्यांना डावलून सलील देशमुख यांना पक्षाने तिकीट दिले होते. तेव्हापासूनच ते अस्वस्थ होते.

भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्या उपस्थितीत त्यांना भाजपात प्रवेश झाला. यावेळी सावनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आशिष देशमुख, काटोल विधानसभा मतदारसंघाचे आमदार चरणसिंग ठाकूर, राजू पोतदार, भाजपचे जिल्हाध्यक्ष मनोहर कुंभारे आदी यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.

चंद्रशेखर चिखले हे सुमारे 25 वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत. अनिल देशमुख त्यांचे नेते होते. पंचायत समितीचे ते सभापती होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष होते. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष असतानाही त्यांना अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी थांबायला लावले.

2019 च्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत त्यांच्या मेटपांजरा जिल्हा परिषद सर्कलमधून सलील देशमुख यांना उमेदवारी दिली होती. देशमुख निवडून आले. तेव्हापासूनच चिखले अस्वस्थ होते. पाच वर्ष ते शांत बसले होते.

Anil Deshmukh Devendra Fadnavis
Ajit Pawar : अजितदादांनी शब्द खरा केला; ‘माळेगाव’च्या चेअरमनपदाची धुरा स्वीकारली, उपाध्यक्षपदी महिलेला संधी!

विधानसभेच्या निवडणुकीत काटोल विधानसभा मतदारसंघातून सलील देशमुख यांना शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी दिली होती. या निवडणुकीत भाजपच्या चरणसिंग ठाकूर यांनी सलील देशमुख यांचा पराभव केला. हे बघता सलील देशमुख पुन्हा मेटपांजरा जिल्हा परिषदेच्या सर्कलमधून निवडणूक लढणार असल्याचे दिसून येते. त्यामुळे पुन्हा पाच वर्षे रिकामे बसण्याची वेळ चिखले यांच्यावर येणार होती.

त्यापूर्वीच त्यांनी राजीनामा देऊन भाजपात प्रवेश केला असल्याचे समजते. भाजपचे चिखले यांना उमेदवारी दिल्यास त्यांना आपल्याच नेत्याच्या पुत्राविरोधात जिल्हा परिषदेची निवडणू लाढावी लागणार असल्याचे दिसून येते.

Anil Deshmukh Devendra Fadnavis
Devendra Fadnavis: विजयी मेळाव्यानंतर फडणवीसांनी मानले राज ठाकरेंचे आभार; तर उद्धव यांची 'या' एकाच शब्दात उडवली खिल्ली

भाजपने नागपूर जिल्ह्यात ऑपरेशन लोटस सुरू केले आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या अनेक माजी जिल्हा परिषद सदस्यांना आपल्याकडे वळवले जात असल्याचे दिसून येते. यापूर्वी जिल्हा परिषद सभापती उज्ज्वला बोढारे, जिल्हा परिषद सदस्य समीर उमप, दुधराम सव्वालाखे यांनीसुद्धा भाजपात प्रवेश केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com