Ashish Deshmukh : अनिल देशमुखांचा पेनड्राईव्ह ‘करप्ट', पुतण्यानेच केला गौप्यस्फोट

Ashish Deshmukh On Anil Deshmukh : राज्यात सध्या गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यात ‘पेनड्राईव्ह'वरून चांगलीच जुंपली आहे. फडणवीस यांनी महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी आपल्यावर दबाव टाकल्याचा आरोप देशमुखांनी केला होता.
Anil Deshmukh and Dr. Ashish Deshmukh
Anil Deshmukh and Dr. Ashish DeshmukhSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News, 26 July : मुलाने काटोल विधानसभा मतदारसंघावर दावा केल्याने राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातून लढायचे आहे. त्यामुळे ते मुद्दाम फडणवीसांवर उलसुलट आरोप करत असल्याचा गौप्यस्फोट भाजपचे प्रवक्ते तथा माजी आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी केला आहे.

तसंच अनिल देशमुख यांच्याकडे असलेला पेनड्राईव्ह ‘करप्ट' असल्याचा दावाही आशिष यांनी केला आहे. राज्यात सध्या गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यात ‘पेनड्राईव्ह'वरून चांगलीच जुंपली आहे.

महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) आपल्यावर दबाव टाकल्याचा आरोप देशमुख यांनी केला होता. त्यावर फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांबाबत तुम्ही काय बोलला याचा पेनड्राईव्ह आपल्याकडे असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी देशमुखांनी देखील तुमचाही पेनड्राईव्ह माझ्याकडे आहे, असं म्हणत फडणवीसांना प्रत्त्युतर दिलं होतं.

या वादात आता अनिल देशमुखांचे (Anil Deshmukh) पुतणे आशिष देशमुख यांनी उडी घेतली आहे. आपल्या काकावर आशिष यांनी टीका करत मोठा गौप्यस्फोटही त्यांनी केला आहे. ते म्हणाले, सलील देशमुख यांनी काटोल-नरखेड विधानसभा मतदारसंघावर दावा केला आहे. यासाठी त्यांनी शरद पवार व सुप्रिया सुळे यांच्या भेटी घेतल्या आहेत. त्यामुळे अनिल देशमुख यांच्यावर नवीन मतदारसंघ शोधण्याची वेळ आली आहे.

Anil Deshmukh and Dr. Ashish Deshmukh
Kalyan BJP : श्रीकांत शिंदेच्या बालेकिल्ल्यातील पाचही विधानसभा मतदारसंघावर भाजपचा डोळा, शिवसेनेतील इच्छुकांचं काय?

महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला देवेंद्र फडणवीस यांचा दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघ येणार आहे. हे कळल्यावर अनिल देशमुखांनी फडणवीस यांच्या विरोधात मोहीम उघडली आहे. या माध्यमातून ते दक्षिण-पश्चिमवरील आपला दावा भक्कम करीत असल्याचे आशिष देशमुख म्हणाले.

तसंच, अनिल देशमुखांच्या आरोपांमध्ये काहीच तथ्य नाही. मागील दीड वर्ष ते शांत बसले होते. आता निवडणुकीच्या तोंडावर मतदारसंघ उपलब्ध नसल्यामुळे आणि फडणवीसांच्या विरोधात लढता यावं म्हणून ते खोटे आरोप करून मीडियाचे लक्ष आपल्याकडे वेधून घेत आहेत. 'पेनड्राईव्ह'बद्दल सांगायचं झाल्यास, त्या पेनड्राईव्हमध्ये नक्कीच काहीच गोपनीय माहिती नाही. त्यांचा पेनड्राईव्ह करप्ट आहे. त्या पेनड्राईव्हमध्ये काही तथ्य असल्यास त्यांनी ते जनतेसमोर आणावे. अन्यथा ते स्टंट म्हणून पेनड्राईव्ह दाखवत असल्याचे सिद्ध होईल, असंही आशिष देशमुख म्हणाले.

Anil Deshmukh and Dr. Ashish Deshmukh
Congress In Mahavikas Aghadi : काँग्रेसचं विधानसभेसाठी पुढचं पाऊल, 10 नेते फायनल; जागा वाटपासाठी समिती ठरली

मागील 13 महिने अनिल देशमुख हे कारागृहात होते. परिवारातील एक सदस्य म्हणून आम्हाला त्यांची चिंता आहे. काचेच्या घरात राहणारे दुसऱ्यांच्या घरावर दगडफेक करत नसतात. त्यावेळी ईडी, सीबीआय, राज्य सरकारच्या आयोगासमोर त्यांनी हे तथ्य का आणले नाही? असा सवालही आशिष देशमुख यांनी काकांना विचारला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com