Kalyan BJP : श्रीकांत शिंदेच्या बालेकिल्ल्यातील पाचही विधानसभा मतदारसंघावर भाजपचा डोळा, शिवसेनेतील इच्छुकांचं काय?

Kalyan Lok Sabha constituency BJP Vs Shivsena : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कल्याण डोंबिवलिच्या जागेवरुन भाजप आणि शिवसेना शिंदे गटासमोर नवा पेच निर्माण झाला आहे. कारण कल्याण लोकसभा मतदारसंघातील पाचही विधानसभा मतदार संघावर भाजपने दावा केला आहे.
Eknath Shinde, Srikanth Shinde, Devendra Fadnavis
Eknath Shinde, Srikanth Shinde, Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News, 26 July : राज्यात सध्या महायुतीचं सरकार आहे. आधी शिंदे-फडणवीस आणि त्यानंतर अजित पवार या सरकारचा भाग बनले. महायुतीतील या वरिष्ठ नेत्यांचं एकमत झालं असलं, तरी स्थानिक पातळीवरील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचं मनोमिलन अद्याप झाल्याचं पाहायला मिळत नाही.

याबाबतची अनेक उदाहरण समोर येत असतात. शिवाय नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही मित्र पक्षांनी दुसऱ्या आपल्या पक्षाच्या उमेदवाराला तिकीट दिलं नाही, म्हणून मित्र पक्षाच्या उमेदवाराचं काम केलं नसल्याची ओरड महायुतीत सुरु आहे. तर आता विधानसभेच्या काही जागा वाटपावरुनही महायुतीत वाद होण्याची शक्यता आहे.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कल्याण डोंबिवलिच्या (Kalyan Dombivli) जागेवरुन भाजप आणि शिवसेना (Shivsena) शिंदे गटासमोर नवा पेच निर्माण झाला आहे. कारण कल्याण लोकसभा मतदारसंघातील पाचही विधानसभा मतदार संघावर भाजपने दावा केला आहे. याबाबतची माहिती भाजप जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी यांनी दिली आहे. त्यामुळे आता या मतदारसंघात शिंदेंच्या सेनेतील इच्छुकांचं काय होणार याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

Eknath Shinde, Srikanth Shinde, Devendra Fadnavis
Sudhir Mungantiwar : लाडकी बहीण योजनेवरुन मंत्री मुनगंटीवारांचा संताप; विरोधकांना म्हणाले, '...तेव्हा ओठाला फेव्हिकॉल चिटकवला होता का?'

कल्याण पूर्व, कल्याण पश्चिम, डोंबिवली, कल्याण ग्रामीण, अंबरनाथ या पाचही मतदारसंघावर भाजपने (BJP) दावा केला आहे. शिवाय या पाच विधानसभा मतदारसंघात आमची तयारी सुरू असल्याचंही भाजप जिल्हाध्यक्षांनी सांगितलं आहे. माध्यमांशी बोलताना भाजप जिल्हाध्यक्ष म्हणाले, "भाजप या विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक आहे. आमची ताकद पाचही विधानसभा मतदारसंघात आहे.

या ठिकाणी आमचे तुल्यबळ उमेदवार असून ते पाचही उमेदवार आम्ही निवडून आणू शकतो. तसंच जिथे संधी मिळते तिथे मिळावीच पण जिथं मिळत नाही तिथे देखील आम्हाला संधी मिळावी. पाच विधानसभा निवडून आल्यावर महायुतीचे सरकार भक्कमपण येईल," असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Eknath Shinde, Srikanth Shinde, Devendra Fadnavis
Congress In Mahavikas Aghadi : काँग्रेसचं विधानसभेसाठी पुढचं पाऊल, 10 नेते फायनल; जागा वाटपासाठी समिती ठरली

तर कल्याण पूर्वमध्ये शिंदे गटाकडून तयारी सुरु आहे, याबाबत प्रश्न विचारला असता ते म्हणाले, मित्रपक्ष तयारी करु शकतात. तयारी करतात ते चांगलंच आहे. त्यांच्या तयारीमुळे महायुतीच्याच उमेदवाराला मदत होईल. तसंच महायुतीत बंडखोरी होणार नसल्याचा दावा देखील सुर्यवंशी यांनी केला.

ते म्हणाले, "जागावाटपाच्या चर्चांनंतर महायुतीत बंडखोरी होणार नाही. आम्ही सगळे महायुती म्हणून एक आहोत. कल्याण पूर्वमध्ये भाजपचा उमेदवार असावा ही इच्छा आहे. मात्र, शेवटी वरीष्ठ देतील तो उमेदवार आम्ही निवडून आणू."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com