Bacchu Kadu News : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी यांच्या विधानावरुन राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे. पुढच्या विधानसभा निवडणुकीत 52 आमदार निवडून आणणार, असे बावनकुळे यांनी म्हटले होते. यावर प्रहारचे आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) म्हणाले, त्यांचे आडनाव 52 असल्याने त्यांनी 52 आमदार निवडून आणणार असे सांगितले असेल, असा टोला बच्चू कडू यांनी लगावला आहे.
प्रहारसुद्धा विदर्भात दहा आमदार निवडून आणणार असल्याचे बच्चू कडू यांनी सांगितले. आमचे दहा आमदार आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये निवडून आणू, असा निर्धार कडू यांनी व्यक्त केला. ते माध्यमांशी बोलत होते. कडू म्हणाले, बावनकुळे यांची जादू किती चालणार आहे, ते बघू. सरकारच्या अडीच वर्षांच्या कामगिरीवर ते अवलंबून आहे.
विदर्भात सर्व खासदार निवडून आणू असेही बावनकुळे म्हणाले होते. यावर बोलताना कडू म्हणाले, शिंदे-भाजपची (BJP) सरकार असल्यामुळे कदाचित ही जादू होऊ शकते, असे त्यांनी सांगितले. २०२४ मध्ये फडणवीस मुख्यमंत्री असतील, असेही बावनकुळे म्हणाले होते. यावर बोलताना कडू म्हणाले, भविष्यवाणी करण्यात काही अर्थ नाही. जर तर मध्ये आम्ही विश्वास ठेवत नाही, असेही कडू म्हणाले.
फडणवीस मुख्यमंत्री होऊ शकतात किंवा शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकतात. प्रहार या लहान पक्षाचापण मुख्यमंत्री होऊ शकतो, असेही कडू म्हणाले. येणाऱ्या काळात प्रहारचाही मुख्यमंत्री होऊ शकतो, असा दावाही कडू यांनी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.