

Bachchu Kadu News : प्रहार संघटनेतील अंतर्गत नाराजी पुन्हा उघडपणे समोर आली आहे. आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वावरच कार्यकर्त्यांकडून गंभीर आरोप करण्यात आले आहेत. वर्धा दौऱ्यावर आलेल्या कडू यांच्या कार्यक्रमाला प्रहारच्या काही पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी अनुपस्थित राहिल्याने संघटनेतील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली.
आर्वी मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवलेले प्रहारचे पदाधिकारी जय बेलखेडे यांनी आमदार कडू यांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली. “आम्ही विविध आंदोलने केली; मात्र त्या आंदोलनांचा फायदा त्यांनी घेतला. प्रहार संघटना उभी करण्यासाठी कार्यकर्त्यांनी मोठे कष्ट घेतले, मात्र बच्चू कडू यांच्या राजकीय भूमिकेमुळे कार्यकर्त्यांची गोची होत आहे"
बच्चू कडू यांनी शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर प्रहारच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाल्याचा दावा यावेळी करण्यात आला. "संघटनेच्या भवितव्याबाबत कार्यकर्त्यांमध्ये चर्चा सुरू असून, पुढील राजकीय भूमिका कार्यकर्त्यांशी चर्चा करून ठरवली जाईल", असेही बेलखेडे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, या आरोपांवर बच्चू कडू यांनीही स्पष्ट भूमिका मांडली. “बेलखेडेंनी प्रहारचे काम आणखी जोरात सुरू करावे. आमचा त्यांना पूर्ण पाठिंबा आहे. प्रहार संपवण्याचा विषयच नाही. शिवसेनेसोबतचा प्रवास हा राजकीय असून, प्रहार ही सामाजिक संघटना म्हणून कायम राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
संघटनेच्या भूमिकेबाबत ज्यांना नाराजी किंवा खंत आहे, त्यांनी संघटनेत राहण्याबाबत निर्णय घ्यावा, अशी भूमिकाही बच्चू कडू यांनी मांडली. “पटत नसेल तर चालते व्हा,” या स्पष्ट शब्दांत बच्चू कडू यांनी नाराज कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर दिल्याने प्रहारमधील अंतर्गत संघर्षाला आता अधिक धार आली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.