
Bhandara Milk Union Election Update - भंडारा सहाकरी दूध संघाच्या निवडणुकीत शिवसेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकर आणि काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी आपसात हात मिळवणी केल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपकडून भोंडेकर आणि पटोले यांना लक्ष्य करून त्यांच्यावर आरोप केले जात आहेत.
यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांनी 'चिल्लर' असे संबोधल्याने नाना पटोले चांगलेच संतापले आहेत. त्यांनी थेट आता एअर इंडियाच्या घोटाळ्यावर बोलायचं का? अशी विचारणा करून पटेल यांना एकप्रकारे इशाराच दिला आहे. तसेच, 'पटेल यांनी आपल्या गोंदिया जिल्ह्याचा दूध संघ बुडवला, आता त्यांना भंडाराचा संघ बुडवायचा आहे, असा पटोले यांनी आरोपही केला.
शिवाय, 'भंडारा सहकारी दूध संघ विदर्भातील सर्वाधिक यशस्वी संघ आहे. सर्वाधिक दूध संकलनही याच संघाद्वारे केले जाते. प्रफुल पटेल यांना आपल्या जिल्ह्यातील दूध संघ सांभाळता आणि विकसित करता आला नाही. आता ते आमच्या जिल्ह्याच्या संघामागे लागले आहेत. त्यामुळे या निवडणुकीत उडी घेतली.' असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.
याशिवाय 'नरेंद्र भोंडकर हे आमचेच आहेत. सहकार क्षेत्राच्या निवडणुका पक्षावर लढल्या जात नाही. पक्षाच्या चिन्हांचाही वापरही होत नाही, पॅनेल तयार केले जातत. मात्र पटेल आणि भाजपने यंदा या निवडणुकीत जास्तच इंटरेस्ट घेतला आहे. हा संघ वाचवायचा असल्याने आम्हीही तेवढ्याच ताकदीने या निवडणुकीत उतरलो आहोत. भाजपचे आमदार परिणय फुके माझ्यावर आणि भोंडेकर यांच्यावर रोज आरोप करीत आहेत. मात्र त्यांच्या आरोपाला मी उत्तर द्यायचे नाही असे ठरवले आहे. त्यांच्या आरोपांना उत्तर देऊन मला लहान व्हायचे नाही.' असेही पटोले यांनी यावेळी सांगितले.
याचबरोबर 'मात्र एका राष्ट्रीय पक्षाचा कार्याध्यक्ष व खासदार प्रफुल पटेल मला चिल्लर म्हणत असेल, तर मी काहीच बोलू नये अशी अपेक्षा त्यांनी ठेवू नये. संजय राऊत यांच्यापेक्षा जास्त मुद्दे व पुरावे माझ्याकडे आहेत. एअर इंडियाच्या ११-१२च्या ऑडिट रिपोर्टमध्ये कोणाकोणाची नावे आहेत आणि किती कोटींचा घोटाळा झाला याची माहिती आपल्याकडे आहे. राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीत का सहभागी झाली याचे उत्तर यात दडले असल्याचे पटोले यांनी यातून अप्रत्यक्षपणे सांगितल्याचे बोलले जात आहे, शिवाय, मी चिल्लर नाही, असेही पटोले यांनी सांगून टाकले.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.