Bhaskar Jadhav News : '..आणि तुमची गंगा मैली होऊ देऊ नका' ; भास्कर जाधवांचा मुख्यमंत्र्यांना सल्ला!

Bhaskar Jadhav to Devendra Fadnavis News : मंत्रिमंडळात ४२ जणांचा समावेश आहे. मात्र सर्व बिनखात्याचे मंत्री आहेत, असा टोलाही जाधवांनी लगावला आहे.
bhaskar Jadhav and Fadnavis
bhaskar Jadhav and FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Nagpur Legislative Assembly Winter Session : हिवाळी अधिवेशन बीड, परभणी आणि पीक विमा घोटाळा या विषयावर प्रामुख्याने गाजले. मस्साजोग येथील सरपंच देशमुखांचा खून आणि पीक विमा योजनेतील घोटाळ्याकडे सर्वांनीच लक्ष वेधले. सर्वांचा रोख मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर होता. हाच धागा कपडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विधानसभेतील गटनेते भास्कर जाधव यांनी भ्रष्ट मंत्री आणि अधिकाऱ्यांना वाचवू नका आणि तुमची गंगा मैली होऊ देऊ नका, असा सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला.

भास्कर जाधव(Bhaskar Jadhav) म्हणाले, पीक विमा कंपन्यांचा घोटाळ्याची व्याप्ती आणि कोट्यवधीची आकडेवारी ऐकून शॉक बसला आहे. विरोधकांनीच नव्हे तर भाजपच्याही आमदाराने पीक विमा कंपन्या यांचा आणि तत्कालीन कृषिमंत्र्यांचा संबंध असल्याचा आरोप केला आहे.

तसेच, त्यामुळे आता घोटाळेबाज मंत्र्यांवर पांघरून घालू नका आणि ‘राम तेरी गंगा मैली हो गयी, पापीओ के पाप धोते धोते...‘असे विडंबनात्मक काव्य तुमच्यावर होऊ देऊ नका, असा सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांना भास्कर जाधव यांनी विधानसभेत दिला.

bhaskar Jadhav and Fadnavis
Parliament Winter Session : मोठी बातमी! संसद आवारात खासदारांमधील धक्काबुक्की प्रकरणी आता 'SIT' गठीत

सत्ताधारी आणि विरोधकांच्या प्रस्तावावर ते बोलत होते. भास्कर जाधव म्हणाले, 'नागपूर करारानुसार हिवाळी अधिवेशानातून विदर्भ, शेतकरी व मागास भागांवर चर्चा व्हावी, त्यांच्या प्रश्नांना वाचा फुटावी, काही त्यांच्या पदारता पडावे अशी अपेक्षा आहे. मात्र सहा दिवसांच्या अधिवेशन शेतकरी, कर्जमाफी, शेतमालाचे भाव, खरेदी यावर काहीच चर्चा झाली नाही. मंत्रिमंडळात ४२ जणांचा समावेश आहे. मात्र सर्व बिनखात्याचे मंत्री आहेत. वर्षभरात'

bhaskar Jadhav and Fadnavis
Cabinet Portfolio Allocation : मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर, गृह फडणवीसांकडेच, अजितदादांना अर्थ तर एकनाथ शिंदेंकडे...मंत्र्यांना कोणती खाती? संपूर्ण यादी!

तसेच, ' सात हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. हा मोठा विक्रमच आहे. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई अद्याप देण्यात आली नाही. पीक विमा कंपन्यांनी कहरच केला आहे. सरकारी यंत्रणा आणि अधिकाऱ्यांच्या वापर करून कोट्यवधीचा भ्रष्टाचार केला. मुख्यमंत्र्यांनी याची गंभीर दखल घेण्याची आवश्यकता आहे. मंत्री आणि अधिकाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न करू नका. अन्यथा दुसऱ्याची पापे धुता धुता तुमची गंगा मैली होईल, याकडे लक्ष वेधले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com