Bhavana Gawali : भावना गवळींनी पुन्हा बोलून दाखवली मनातील खदखद ; ‘लोकसभेला सर्व्हेमुळे माझा बळी गेला...’

Mahayuti Meeting : जे काही सर्व्हे करण्यात येत आहेत. मात्र, सर्व्हेमुळेच या भावना गवळीचा बळी गेला आहे. आता विधानसभेत असा कोणाचा बळी जाऊ देऊ नका, असे आवाहनही भावना गवळी यांनी केले आहे.
Bhavana Gawali
Bhavana GawaliSarkarnama
Published on
Updated on

Yavatmal, 01 October : लोकसभा निवडणुकीत सर्व्हेमुळे माझा बळी गेला. आता आगामी निवडणुकी कोणाचा बळी जाऊ देऊ नका, असे विधान शिवसेनेच्या विधान परिषद सदस्य भावना गवळी यांनी केले. या विधानातून गवळी यांनी पुन्हा लोकसभा निवडणुकीच्या वेळी कापलेल्या तिकिटाबाबत पुन्हा एकदा आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली.

भाजप प्रदेश कार्यकारणी सदस्य शंकरराव बोरकर यांच्या निवासस्थानी रयत शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आमदार सदाभाऊ खोत यांच्या प्रमुख उपस्थितीत महायुतीची बैठक झाली. त्या बैठकीत माजी खासदार भावना गवळींनी (Bhavana Gawali) आपल्या मनातील खंत व्यक्त केली.

लोकसभा निवडणुकीत (Lok sabha Election) भारतीय जनता पक्षाच्या वतीने सर्व्हे करण्यात आला होता. त्या सर्व्हेत यवतमाळच्या तत्कालीन खासदार भावना गवळी आणि रामटेकचे खासदार कृपाल तुमाने यांच्या विरोधात वातावरण दाखविण्यात आले होते. त्यामुळे भाजपच्या दबावामुळे मुख्यमंत्री शिंदे यांना गवळी आणि तुमाने यांचे तिकिट कापावे लागले होते.

Bhavana Gawali
Praniti Shinde : येत्या दोन महिन्यांत सरकारच्या सर्व योजना बंद होणार; प्रणिती शिंदेंचा दावा

भावना गवळी आणि कृपाल तुमाने यांच्या जागी देण्यात आलेल्या उमेदवारांचा पराभव झाला होता, त्यानंतर या दोघांना शिंदे यांनी विधान परिषदेवर संधी दिली आहे. मात्र, भावना गवळी यांनी भाजपच्या वतीने करण्यात आलेल्या सर्व्हेबाबत पुन्हा एकदा आपल्या मनातील खंत बोलून दाखवली आहे.

आमदार भावना गवळी म्हणाल्या, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कानावर मी घालून ठेवते. पण, आमच्या भाऊसाहेबांच्या (देवेंद्र फडणवीस) कानावर तुम्हाला (आमदार सदाभाऊ खोत यांना उद्देशून) घालावं लागणार आहे. देवेंद्रभाऊ, विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यात ही परिस्थिती आहे. आपण असं केलं पाहिजे, ज्यामुळे आमचा आमदार निवडून येऊ शकतो. जनतेची ती इच्छा, भावना आणि मागणी आहे.

Bhavana Gawali
Praniti Shinde : प्रणिती शिंदेंचा राजन पाटलांवर गंभीर आरोप; ‘अप्पर तहसील कार्यालय दम देऊन अनगरला नेलंय’

जे काही सर्व्हे करण्यात येत आहेत. मात्र, सर्व्हेमुळेच या भावना गवळीचा बळी गेला आहे. आता विधानसभेत असा कोणाचा बळी जाऊ देऊ नका, असे आवाहनही भावना गवळी यांनी केले आहे. त्यामुळे वाशिम मतदारसंघातून लोकसभेची तिकिट कापल्याची खदखद भावना गवळी यांनी पुन्हा जाहीरपणे बोलून दाखवली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com