Anil Bonde On Rahul Gandhi : ‘राहुल गांधींची नौटंकी सुरूच राहिली तर…’; अनिल बोंडे यांचा घणाघात

BJP MP Anil Bonde targets Rahul Gandhi and Congress over vote theft allegations and the INDIA bloc protest against electoral roll revision : मतचोरीच्या आरोपांवरून काँग्रेसच्या आंदोलनाला भाजप खासदारांचे प्रत्युत्तर; विरोधकांच्या भूमिकेवर उपस्थित केले प्रश्न.
Anil Bonde On Rahul Gandhi
Anil Bonde On Rahul GandhiSarkarnama
Published on: 
Updated on: 

BJP Congress Political Clash : काँग्रेस आणि भाजप यांच्यातील राजकीय संघर्ष पुन्हा तीव्र झाला आहे. भाजपचे अमरावती येथील खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी काँग्रेस आणि इंडिया आघाडीवर टीका करताना, 1947पासून काँग्रेस आणि त्यांच्या पूर्वजांनी देशाला लुटले, असा आरोप केला.

राहुल गांधी यांच्या आंदोलनाच्या भूमिकेवरही त्यांनी निशाणा साधला. मत चोरीच्या आरोपांवरून विरोधकांनी सुरू केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बोंडे यांचे हे विधान समोर आले आहे.

मत चोरीच्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना डॉ. अनिल बोंडे यांनी मत चोरीचे आरोप फेटाळून लावले. उलट जनता चोरांना मत देत नाही, असे म्हणत त्यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली. राहुल गांधी (Rahul Gandhi) अशाच प्रकारे ‘नौटंकी’ करत राहिले, तर त्यांना देशात कोणीही उभे करणार नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

इंडिया आघाडीच्या आंदोलनावर टीका करताना बोंडे यांनी विरोधक राजकारणाच्या नावाखाली केवळ ‘पिकनिक’ करत असल्याचा आरोप केला. राष्ट्रपती आणि न्यायालयाने (Court) पुरावे मागितले असताना केवळ ‘राजकुमाराचा हट्ट’ पुरवण्यासाठी देशात अशांतता पसरवण्याचे काम सुरू असल्याचेही ते म्हणाले.

Anil Bonde On Rahul Gandhi
Arvind Kejriwal FIR : बंगला साहिब गुरुद्वारा प्रकरणात अरविंद केजरीवालांविरोधात गुन्हा; ‘आप’ची पोलिसांवर टीका

मत चोरी थांबवणे, मतदारयाद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाला (SIR) स्थगिती देणे आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करणे, हे आंदोलनाचे प्रमुख मुद्दे आहेत. या आंदोलनापूर्वी दिल्लीमध्ये विरोधकांच्या निदर्शनांदरम्यान पोलिसांनी अनेक आंदोलकांना ताब्यात घेतल्याचे दिसते. आंदोलकांवर पोलिसांनी बळाचा वापर केल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला होता.

Anil Bonde On Rahul Gandhi
Karnataka Congress : कर्नाटक काँग्रेसला मोठा धक्का? 25 आमदार भाजपच्या संपर्कात; विजयेंद्रांचा दावा

मुख्य आयुक्तांना पदावरून हटवता येते

भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 324(5) नुसार, मुख्य निवडणूक आयुक्तांना सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांप्रमाणेच निर्धारित प्रक्रियेद्वारे पदावरून हटवता येते. इतर निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांची शिफारस आवश्यक असते. ही तरतूद मुख्य निवडणूक आयुक्तांना मनमानी पद्धतीने पदावरून हटवता येत नसल्याचे स्पष्ट करते.

न्यायालयाने व्होट चोरीचे आरोप फेटाळले नाहीत

दरम्यान, 12 ऑक्टोबरच्या वृत्तानुसार, मुख्य न्यायमूर्ती सूर्य कांत यांनी राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेण्याची विनंती नाकारली. संबंधित विषय न्यायप्रविष्ट असल्याने प्रशासकीय स्तरावर आदेश देता येणार नसल्याचे त्यांनी सांगितल्याचे वृत्तात नमूद आहे. मात्र, याचा अर्थ व्होट चोरीचे आरोप न्यायालयाने फेटाळले किंवा बोंडे यांचे सर्व दावे मान्य केले, असा होत नाही.

काँग्रेसच्या इतिहासावर भाजपकडून घाव

एका बाजूला काँग्रेस आणि इंडिया आघाडी निवडणूक प्रक्रियेतील कथित अनियमितता आणि मतदारयाद्यांच्या पुनरीक्षणावर प्रश्न उपस्थित करत आहेत; तर दुसरीकडे भाजपकडून विरोधकांच्या आंदोलनावर टीका केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर डॉ. अनिल बोंडे यांनी काँग्रेसच्या इतिहासापासून राहुल गांधी यांच्या आंदोलनापर्यंत विविध मुद्द्यांवर आरोप केले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com