

चंद्रपूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ४० आमदारांसर शिवसेनेसोबत बंड केल्याने राज्यातील महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकार कोसळलं. यानंतर भाजपच्या साथीने शिंदे यांनी राज्यात नवीन सरकार स्थापन केल आहे. मात्र, भाजप व शिंदे गटाकडून महाविकास आघाडी सरकारच्या कामगिरीवर अद्यापही टीका करण्यात येत आहे. आज (ता.१६ ऑगस्ट) भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अडीच वर्षांत काहीच न करणारे आता आम्हाला सल्ले देत आहेत, असा टोला महाविकास आघाडीच्या नेत्यांना लगावला आहे. त्यांनी चंद्रपूर येथे माध्यमांशी संवाद साधला. (Devendra Fadanvis, Uddhav Thackeray Latest News)
आज चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर येथे 16 ऑगस्ट शहीद क्रांती दिनानिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वन व सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार ,भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, आमदार बंटी भांगडीया, माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर हुतात्मा स्मारकस्थळी जावून आदरांजली वाहिली. दरवर्षी स्थानिक आमदाराच्या पुढाकाराने शहीद दिनाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. यावर्षीही आमदार भांगडीया यांनी या कार्यक्रमाचे आयोजन करत आज या ठिकाणी मोठ्या नेत्यांची उपस्थिती घडवून आणली.
हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी उपस्थित नेते हे बीपीएड कॉलेज मैदानावर आयोजित शहीद सन्मान सोहळ्यात सहभागी झाली होते. यावेळी या कार्यक्रमाला नागरिकांनी मोठी उपस्थिती लावली होती. यावेळी बोलताना फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, गेल्या सरकारने अतिवृष्टी, वादळग्रस्तांना वर्षभर मदत दिली गेली नाही. भाताला 700 रुपयांचे बोनस देण्याची घोषणा केली, पण तीही पूर्ण केली नाही. आम्ही मात्र हे सगळं लगेच करणार आहोत. अडीच वर्षांत ज्यांनी काहीच केले नाही, तेच आता आम्हाला सल्ले देत आहेत, अशी टीकाही फडणवीस यांनी केली.
दरम्यान, नव्या सरकारच्या मंत्रीमंडळाचा खातेवाटप नुकताच झाला असून नवे सरकार आता कामाला लागले आहे. मात्र खातेवाटपात शिंदे गटाला दिलेल्या खात्यावरून आणि मंत्रीमंडळ विस्तार लांबणीवर पडल्याने सरकारवर विरोधकांनी चांगलीच टीका करायला सुरवात केली होती. या सरकारमुळे राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले, असा आरोपही विरोधकांनी केला होता. दरम्यानच्या काळात विधानसभेतील विरोधीपक्ष नेते अजित पवारांनी राज्यातील काही भागाचा दौरा करत सरकारला चांगलेच धारेवर धरले होते. मात्र, आता सराकारचा मंत्रीमंडळ विस्तार झाला आणि खातेवाटप झाल्याने सरकारमधील मंत्री सक्रिय झालेले दिसत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.