Lok Sabha Election 2024 : शिंदे गटाची धाकधूक वाढली, भाजप टाकणार डाव

Buldhana : प्रतापराव जाधव यांना डच्चू मिळण्याची शक्यता वाढली
Prataprao Jadhav :
Prataprao Jadhav :Sarkarnama
Published on
Updated on

Prataprao Jadhav : बुलढाण्याच्या लोकसभेच्या जागेवरून शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि भाजपत सध्या चांगलीच रस्सीखेच सुरू झाली आहे. बुलढाणा लोकसभा मतदारसंघाची जागाही भाजपला हवी आहे. त्यामुळे या मतदारसंघावर भाजपने लक्ष केंद्रित केले आहे. जिल्ह्यातील शिवसेना खासदार प्रतापराव जाधव यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आगामी लोकसभा निवडणुकीत डच्चू देणार असल्याच्या जोरदार चर्चा सध्या रंगल्या आहेत.

राज्यातील आघाडी सरकारमधील शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांच्यासह आमदारांनी बंड करत सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यानंतर आघाडी सरकार कोसळले. त्यानंतर राज्यात शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर झाले. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजप-शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट यांच्यात महायुती कायम राहणार आहे. लोकसभा निवडणुकीच्याअनुषंगाने राज्यात तीनही पक्षांकडून तयारी सुरू झाली आहे.

Prataprao Jadhav :
Lok Sabha Election 2024 : ‘टायमिंग’ साधत धर्मराव बाबा आत्राम घेणार दिल्लीसाठी झेप?

लोकसभा निवडणुकीच्या तयारीत सध्या भाजप आघाडीवर आहे. ‘मिशन 45’ अंतर्गत भाजप निवडणुकीच्या कामाला लागले आहे. पश्चिम विदर्भातील महत्त्वाचा मानला जाणारा आणि शिवसेना शिंदे गटाच्या ताब्यात असलेल्या बुलढाणा लोकसभा मतदारसंघावर भाजपचा डोळा आहे. हा मतदारसंघ मिळविण्यासाठी भाजपकडून प्रयत्न करण्यात येत आहेत.

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे सध्या लोकसभेचे 13 खासदार आहेत. या तेराही लोकसभा जागांवर भाजपने सर्वेक्षण करून घेतले. त्यात बुलढाण्याची जागा चौथ्या क्रमांकावर जाण्याची शक्यता दाखविली आहे. शिवसेनेचा उमेदवार निवडून येत नसल्याचे सर्वेक्षणातून पुढे आले आहे. त्यामुळे ही जागा शिंदे गटाकडून भाजपला देण्यात यावी, अशी मागणी होत आहे. शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे स्थानिक नेते आपली जागा सोडायला तयार नसल्याने या जागेसाठी सेना आणि भाजपमध्ये चर्चा सुरू झाली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

बुलढाणा लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी असलेले केंद्रीयमंत्री भूपेंद्र यादव पाचव्यांदा मतदारसंघात येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विश्वासू असलेले भूपेंद्र यादव यांनी ‘प्रवास योजना’अंतर्गत यापूर्वी तीन वेळा आणि त्यानंतर आणखी एकदा या मतदारसंघाला भेट दिली आहे. यादव यांनी बुलढाणा, चिखली, खामगाव, शेगाव, जळगाव जामोद, मेहकर या तालुक्यांना भेट दिली. मतदारसंघात मुक्कामी राहत भाजपची जिल्हा सुकाणू समिती, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासमवेत चर्चाही केली. त्यांच्या प्रत्येक भेटीने शिंदे गटाची धाकधूक वाढविली.

यादव आता पाचव्यांदा बुलढाणा जिल्ह्यात येऊन राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा बालेकिल्ला असलेल्या सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहेत. त्यांच्या या दौऱ्याकडे शिंदे गटाचेही लक्ष आहे. अद्याप महायुतीत जागा वाटपाचा ‘फॉर्म्युला’ ठरलेला नसला तरी लवकरच जागावाटपाचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. त्यावेळी बुलढाण्याची जागा भाजपच्या खात्यात जाणार का, हे पाहणे रंजक ठरणार आहे.

Edited by : Prasannaa Jakate

R...

Prataprao Jadhav :
Buldhana LokSabha Constituency : शेतकऱ्यांना आधार वाटणारा युवा चेहरा ः रविकांत तुपकर

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com