Lok Sabha Election 2024 : बुलढाणा मतदारसंघ मिळविण्यासाठी भाजपकडून चढाओढ

BJP Politics : पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांची इच्छा; शिवसेनेकडून दावेदारी कायम
Lok Sabha Election Buldhana
Lok Sabha Election BuldhanaSarkarnama
Published on
Updated on

Buldhana Politics : लोकसभा निवडणूक लढविण्याबाबत शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि भाजपमध्ये सध्या बुलढाण्यात जोरदार रस्सीखेच सुरू आहे. भाजपकडून या मतदारसंघात सध्या पूर्वतयारी करण्यात येत आहे. पक्षाच्यावतीने विविध अभियान राबविण्यात येत आहेत. कोणत्याही परिस्थितीत हा मतदारसंघ भाजपला हवा असल्याची चर्चा या निमित्ताने होत आहे.

बुलढाण्याची जागा भाजपला मिळायला हवी, अशी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची इच्छा आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठींकडे बुलढाण्याची जागा भाजपकडे मागणार आहोत, असे प्रतिपादन भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. गणेश मांटे व जिल्हा संपर्कप्रमुख माजी आमदार विजयराज शिंदे यांनी भाजपच्या ‘गाव चलो अभियान’अंतर्गत आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

Lok Sabha Election Buldhana
Buldhana News: दोन गटात हाणामारी; 'स्वाभिमानी'चे जिल्हाध्यक्ष जखमी...

शिवसेनेचा परंपरागत मतदारसंघ म्हणून बुलढाणाकडे पाहिले जाते. सलग तीनदा विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांनी बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून विजय मिळविला आहे. शिवसेनेत झालेल्या फुटीनंतर जाधव यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत ते दाखल झाले आहेत. आगामी लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. जवळपास सर्वच पक्षांनी या निवडणुकीसाठी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. आघाडी, युतीतील जागा वाटपाचा ‘फार्मूला’ही ठरवला जात आहे. अशात बुलढाणा मतदारसंघावर भाजपने दावा सुरू केला आहे. या मतदारसंघाच्या दाव्यावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच दिसत आहे.

अवघ्या काही दिवसांवर आलेल्या लोकसभा निवडणुकीची जय्यत तयारी भाजपकडून सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपने महाराष्ट्रात मिशन 45 सुरू आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांचा बारामती लोकसभा मतदारसंघाचा दौरा असो किंवा भूपेंद्र यादव यांचा बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचा दौरा, हे भाजपच्या ‘मिशन 45’ अंतर्गत सुरू असलेल्या प्रक्रियेचा भाग आहे. भारतीय जनता पार्टीला 2024 लोकसभा निवडणुकीमध्ये सत्ता मिळवायची आहे. त्यासाठी भाजपला राज्यात 2024 मध्ये राज्यात 48 पैकी 45 लोकसभेच्या जागा जिंकायच्या आहेत. हेच भाजपचे ‘मिशन 45’ आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

विदर्भातील बुलढाणा मतदारसंघावर भाजपकडून वारंवार दावा करण्यात येत आहे. दुसरीकडे शिवसेना एकनाथ शिंदे गट मतदार संघावरील दावा सोडायला तयार नसल्याचे दिसत आहे. नुकताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बुलढाणा जिल्ह्यात असताना त्यांनी प्रतापराव जाधवांच्या विरोधातील उमेदवाराचे डिपॉझिट जप्त होईल असा दावा चिखलीच्या सभेत केला होता. यावरून ही जागा शिवसेना सोडणार नसल्याची शक्यता आहे. मात्र कोणत्याही परिस्थितीत हा मतदारसंघ भाजपला हवा आहे. त्यामुळे येथे उपक्रमांचा वेग तीव्र करण्यात आला आहे.

निवडणुकीच्या पूर्वतयारीला सध्या वेग आला असून भाजपकडून ‘गाव चलो अभियान’ हे बुलढाण्यात राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या पत्रकार परिषदेत बोलताना, बुलढाण्याची जागा भाजपाला सोडण्याची मागणी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे करण्यात आल्याची माहिती डॉ. गणेश मांटे व माजी आमदार विजयराज शिंदे यांनी दिली. बुलढाणा मतदारसंघ भाजपचाच असून, पी. जी. गवई, सुखदेव नंदाजी काळे हे भाजपच्या तिकीटावर विजयी झाले आहेत. पी. जी. गवई हे निवडणुकीत उभे असताना 25 दिवस निवडणूक लांबली होती.

Lok Sabha Election Buldhana
Buldhana Scam : शेळी, बोकड वाटपात लोकप्रतिनिधींसह अधिकाऱ्यांचे हात ओले

राजीव गांधी यांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे तेव्हा भाजपचा पराभव झाला होता. त्यानंतर युतीत ही जागा शिवसेनेला दिली गेली. असे असले तरी मूळ जागा भाजपचीच आहे. असा दावाही करण्यात आला आहे. आता दोन्ही पक्षातील सुरू असलेली जोरदार रस्सीखेच त्यामुळे हा मतदारसंघ नेमका कुणाला मिळणार? हे काही दिवसांतच स्पष्ट होणार आहे. एवढे मात्र नक्की की या मतदारसंघावरील दोघांच्या दाव्याने जोरदार चर्चा मात्र राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Edited By : Prasannaa Jakate

Lok Sabha Election Buldhana
Buldhana Politics : राजकारण तापले! तुपकर म्हणाले, कानाखाली आवाज काढण्याच्या पांचट धमकीकडे लक्ष देत नाही!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com