Achalpur Assembly Election 2024 final result live : राज्यातील विधानसभा निवडणुकीचे निकाल समोर येत आहेत. अशातच आता तिसऱ्या आघाडीचे आणि प्रहार संघटनेचे नेते तसेच माजी मंत्री बच्चू कडू (Bachchu Kadu) यांना पराभवाचा धक्का बसला आहे. सध्या त्यांची लाढाई दुसऱ्या नंबरसाठी सुरू आहे.
अचलपूर विधानसभा मतदारसंघात (Achalpur Assembly Constituency ) भाजपचे प्रवीण तायडे यांना 74 हजार, बच्चू कडूंना 57 हजार तर बबलू देशमुख यांना 56 हजार मते मिळाली आहेत. तर आता या विधानसभा आता अवघ्या चार फेऱ्या शिल्लक असल्याने कडू यांचे जिंकणे अवघड असल्याचे दिसत आहे.
त्यामुळे महाविकास आघाडीतून महायुतीत उडी मारणे त्यांना चांगलेच भोवल्याचं पाहायला मिळत आहे. अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू (Bacchu kadu) यापूर्वी पाच वेळा निवडून आले होते. यावेळी त्यांनी तिसरी आघाडी स्थापन केली होती. अचलपूर हा त्यांचा बालेकिल्ला मानला जात होता.
तो भाजपने (BJP) यावेळी उध्वस्थ केल्याचं पाहायला मिळत आहे. अचलपूर मतदारसंघातून प्रहारचे आमदार बच्चू कडू, महाविकास आघाडीचे बबलू देशमुख तर महायुतीचे प्रवीण तायडे (Praveen Tayde) रिंगणात होते. प्रवीण तायडे हे आधी मनसेमध्ये होते. त्यांना उमेदवारी मिळाल्याने भाजपचे काही पदाधिकारी नाराज होते.
याचा फायदा बच्चू कडू यांना होईल असा अंदाज वर्तविला जात होता. कडू यांच्यापुढे त्यांचे मोठे आव्हान उभे राहू नये यासाठी तडजोड केल्याची चर्चा मतदारासंघात होती. बच्चू कडू महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री होते. शिंदे यांनी बंड केल्यानंतर ते त्यांच्यासोबत गेले. महायुतीत असताना त्यांना मंत्रीपद देण्यात आले नाही.
त्यामुळे त्यांनी तिसरी आघाडी निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्याला फारसे यश मिळाले नाही. असे असले तरी तिसऱ्या आघाडीत असलेले छोटे मोठे पक्ष व त्यांचे समर्थक कडू यांच्यासोबत असल्याने तेच विजयी होतील असा दावा केला जात होता. मात्र तायडे यांनी बच्चू कडू यांना पराभवचा धक्का दिला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.