BRS News : हाच वेग कायम राहिला, तर महाराष्ट्रात बीआरएसला रोखणे होणार अवघड !

Maharashtra : सुरुवातीलाच त्यांना चांगले यश येत आहे.
KCR, BRS
KCR, BRSSarkarnama
Published on: 
Updated on: 

Ignoring the criticism, BRS moved ahead rapidly : तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी टीआरएस ची बीआरएस (भारत राष्ट्र समिती) करून देशभरात जाळे निर्माण करायला सुरुवात केली आहे. त्यांच्या सभा आणि कार्यकर्त्यांचे मेळावे धडकी भरवणारे ठरत आहेत. स्वतःहून लोक बीआरएसमध्ये सहभागी होत असल्याचे दिसत आहे. (Considering farmers as the focal point, he set foot in Maharashtra)

२०१४च्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पक्षाने सोशल मिडियाचा प्रभावी वापर केला होता. त्याच जोरावर भाजप आजही देशात सत्तेत आहे. अगदी त्याच प्रमाणे बीआरएसने सर्व सोशल मिडियाचा वापर करून महाराष्ट्रातील लोकांना आपलेसे करण्याचे काम सुरू केले आहे. सुरुवातीलाच त्यांना चांगले यशही येत आहे.

शेतकरी हा केंद्रबिंदू मानून त्यांनी महाराष्ट्रात पाऊल ठेवले. शेतकऱ्यांसाठी ज्या योजना आम्ही तेलंगणामध्ये राबवल्या, त्याच महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी राबवल्या, तर महाराष्ट्र सोडून आम्ही पुढच्या राज्यात निघून जाऊ, अशी घोषणा त्यांनी नागपुरातील कार्यकर्ता मेळाव्यात केली होती.

केसीआर यांच्या घोषणेवर भाजप, कॉंग्रेस आदी पक्षांच्या नेत्यांनी टिकाही केली. पण त्यांच्या टीकेकडे दुर्लक्ष करत बीआरएस वेगाने पुढे निघाली आहे. २०२४ची निवडणूक डोळ्यांसमोर ठेऊन त्यांचे काम सुरू झाले आहे. त्यांचे सर्व मुख्य कार्यकर्ते डिजिटल आहेत आणि नवीन कार्यकर्त्यांनाही डिजिटली जोडून घेतले जात आहे.

KCR, BRS
BRS Offer Pankaja Munde : मोठी बातमी ! पंकजा मुंडेंना 'बीआरएस'कडून थेट मुख्यमंत्री पदाची 'ऑफर'!

सध्याच्या घडीला ज्या पद्धतीने त्यांना प्रतिसाद मिळतोय, ते बघून महाराष्ट्रात पूर्णतः परिवर्तन जरी नाही झाले, तरीही पहिल्याच प्रयत्नात मोठे यश बीआरएसला मिळेल, असे राजकीय जाणकारांचे मत आहे. बीआरएसची नांदेडची पहिली सभा केवळ तीन ते चार दिवसांत आयोजित केली होती. तरीही त्या सभेला ६० ते ७० हजारांच्या वर लोक आले होते. ही गर्दी आणलेली नाही, तर लोक स्वतःहून आले होते, असे बीआरएसच्या समन्वयकांनी सांगितले.

नांदेडची सभा झाल्यानंतर दोन महिन्यांनंतर छत्रपती संभाजी नगरला सभा झाली, तेथेही तीच परिस्थिती होती. नागपुरात (Nagpur) १५ जूनला कार्यालयाचे उद्घाटन केले. त्यावेळी सुरेश भट सभागृहात त्यांचा कार्यकर्ता मेळावा झाला, तेथे सभागृह पूर्ण खचाखच भरून खाली पायऱ्यांवरही लोक बसले होते. पार्किंगचा परिसरही लोकांच्या गर्दीने फुलून गेला होता. आम्ही येवढ्या लोकांना बोलावले नव्हते, बोलावले असते तर तशी व्यवस्था आम्ही केली असती. पण लोक स्वतःहून आले होते, असे बीआरएसच्या समन्वयकांनी सांगितले.

KCR, BRS
BRS News : कांद्यानंतर महाराष्ट्रातील दूधही घेणार तेलंगणा सरकार... !

एके काळी आम आदमी पक्षाची सोशल मिडियाची धुरा सांभाळलेले जयंत देशमुख आता बीआरएसचा सोशल मीडिया सांभाळत आहेत. बीआरएस शेतकऱ्यांचे (Farmers) मने जिंकण्याचे काम करीत आहे आणि आजघडीला लोकांचा बीआरएसकडे वाढता कल बघता. हा पक्ष भविष्यात मोठी कामगिरी करेल, असे वाटण्याला पुरेपूर वाव आहे. आजचा वेग कायम राहिल्यास महाराष्ट्रातील (Maharashtra) प्रस्थापित पक्षांना भविष्यात बीआरएसला रोखणे अवघड होणार आहे.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.