Budget 2024 : निर्मला सीतारमण यांच्या हाती जो कागद येतो, तेवढंच त्या वाचतात !

Yashomati Thakur On Budget : निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून ज्या आणि जशा पाहिजे, तशा घोषणा केल्या गेल्या आहेत.
Nirmla Sitaraman and Yashomati Thakur
Nirmla Sitaraman and Yashomati ThakurSarkarnama
Published on
Updated on

Budget 2024 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण पॉवरफुल आहेत, छान घोषणा या ठिकाणी करतील, अस वाटलं होतं. पण आता वाटायला लागलं आहे की, त्यांच्याही हातात काही राहिलेले नाही. त्यांच्यासमोर जो कागद येतो तोच त्या वाचतात. त्याच्या पलीकडे त्यांनाही डोकं वापरण्याची मुभा त्या ठिकाणी दिलेली नाही, असे म्हणत माजी मंत्री आमदार यशोमती ठाकूर यांनी आज सादर झालेल्या बजेटवर प्रहार केला.

अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर आमदार ठाकूर आज (ता. १) पत्रकारांशी बोलत होत्या. त्या म्हणाल्या, हा अर्थसंकल्प मोघम झालेला आहे. निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून ज्या आणि जशा पाहिजे, तशा घोषणा केल्या गेल्या आहेत. वास्तविकतेमध्ये या अर्थसंकल्पात काहीच नाही. शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसलेली आहेत. थोडक्यात काय तर शेतकऱ्यांना चांगलाच चुना लावलेला आहे. शिक्षक, विद्यार्थ्यांसाठी काहीच नियोजन झालेले नाही.

Nirmla Sitaraman and Yashomati Thakur
Yashomati Thakur news : बाजार समितीनंतर खरेदी-विक्री संघावरही एकहाती सत्ता!

बेरोजगारांसाठी काही नियोजन झालेले नाही. पेट्रोल, डिझेलचे भाव तेवढेच आहे. त्याबद्दल काय करणार, हे सरकारने सांगितलेले नाही. शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळत नाही. कपाशीचे भाव एवढे खाली पडलेले आहेत की, एवढा कमी भाव याच्या आधी कधीच नव्हता. 2009 मध्ये 10 ते 11 हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला होता. मात्र आता 4000 च्या खाली भाव दिला जात आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना जगायचे कसे, हा यक्ष प्रश्‍न आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सोयाबीनचे भाव पूर्णतः कोसळले आहेत. त्याकडे सरकारचे काहीही लक्ष नाही. आरोग्याच्या बाबतीत सरकार उदासीन आहे. प्रत्येकाला म्हणताहेत की तुम्ही अयोध्येला जा, दर्शन करून घ्या. इकडे बजेटमध्ये सर्वत्र गोंधळ करून ठेवलेला आहे. निवडणुका तोंडावर असल्यामुळे मंदिराचे काम अर्धवट ठेऊन सरकारने उद्घाटन केले. नव्हे इव्हेंट केला आहे. धर्माच्या नावावर नुसते राजकारण सुरू आहे, अशी टिका आमदार ठाकूर यांनी केली.

अंगणवाडी ताईंसाठी बजेटमध्ये काहीही नाही. विदर्भासाठी तर काहीच नाही. आशाताईंसाठीसुद्धा काही तरतूद केल्याचे दिसत नाही. शिक्षक आणि बेरोजगारांची घोर उपेक्षा या बजेटने केलेली आहे. अतिशय ‘फेलीवर’ असे हे बजेट आहे. देशवासीयांच्या भविष्याची चिंता या सरकारला नाही, हे निर्मला सितारमण यांनी सादर केलेल्या बजेटमधून दिसते आहे, असे म्हणत हा बजेट अत्यंत निराशाजनक असल्याचे आमदार यशोमती ठाकूर म्हणाल्या.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com