Chandrapur Politics : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या धर्तीवर राजकीय पक्षांमध्ये इन्कमिंग, आऊटगोईंगला वेग आला आहे. दावे- प्रतिदावे, आरोप- प्रत्यारोपांनी राजकीय वातावरण तापवलं जात आहे. यातूनच सगळे पक्ष चर्चेत राहण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. त्यासाठी कार्यकर्त्याच्या बैठका,सभा,मेळावे पक्षप्रवेश असे विविध उपक्रम राबविले जात आहेत. गावागावातील पक्षांच्या कार्यकर्त्यात प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे.
भाजपचे गोंडपिपरी तालुकाध्यक्ष बबन निकोडे, सुरगावचे सरपंच पोचमल्लू उलेंदला,संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष साईनाथ माष्टे व महिला तालुकाध्यक्ष सुरेखा श्रिकोंडावर हे कार्यकर्त्याच्या सोबत गेले होते. चंद्रपूर तालुक्यातून ३० कार्यकर्ते घेउन ते राजु-याला पोहचले, सुधीर मुनगंटीवार(Sudhir Mungantiwar), देवराव भोंगळें यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्याचा पक्षप्रवेश झाला.
राजुरा येथील भाजप कार्यालयात नुकताच पक्षप्रवेशाचा कार्यक्रम घेण्यात आला. गोंडपिपरी तालुक्यातील शेतकरी संघटना व शिवसेनेच्या ३० कार्यकर्त्यांचा यावेळी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार व विधानसभा प्रमुख देवराव भोंगळे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला.
भाजप(BJP) पक्षाला कार्यकर्ते मिळवून दिल्यामुळे आपल्या नेत्यासमोर माहोल झाला याचा आनंद त्यांना गगनात मावेनासा झाला. मोहीम फत्ते झाल्याचे समजून त्यांनी समाधानाचा सुस्कारा सोडला. गावाकडे परतले. अन् मग पक्षप्रवेशाचे फोटो सोशल मीडियावर टाकले. त्याखाली मजकूर लिहून कुणाकुणाचे श्रेय आहे याबाबतची माहिती दिली.
काहीच वेळात पक्षप्रवेशाच्या श्रेयवादाची लढाई समाजमाध्यमातून सुरू झाली. अन् हा विषय सार्वजनिक झाला. वरवर अतिशय साधारण दिसणारा विषय टोकाला पोहचला. ही माहिती जिल्हयातील वरिष्ट नेत्यापर्यत पोहचली. त्यांनी दोघांनाही चांगलेच झापले. असल्या भानगडीत पडू नका, असे खडे बोल सुनावले.
पक्षप्रवेशाचा कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पाडून ही मंडळी गावाकडे परतली. अन् मग पक्षप्रवेशाचे फोटो, त्याखाली मजकूर लिहून विषय सार्वजनिक करण्यात आला. यानंतर मात्र साईनाथ माष्टे व पोचमलल्लू पोलंदला यांच्यात मजकुरातील नावावरून चांगलाच वाद पेटला.
भाजप कार्यकर्त्यांमधील वादाचीच चर्चा रंगली. राजुरा विधानसभा क्षेत्रात सध्या विविध स्वरूपाचे उपक्रम घेण्याकरिता काॅग्रेस व भाजपत प्रचंड रस्सीखेच सुरू आहे.अशा परिस्थितीत भाजपचे काही नेते श्रेयवादासाठी असे प्रकार करत आहेत. भाजपच्या पक्षप्रवेशाच्या श्रेयवादातून टोकाल्या गेलेल्या या वादाची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगत आहे.
अन् समज-मिलाई झाली..!
पक्षप्रवेशाच्या मुदयावरून गोंडपिपरीत भाजपच्या दोन नेत्यांतच जुंपल्याची माहिती जिल्हास्तरापर्यत पोहचली. वरिष्ठ नेत्यांनी या दोघांनाही चांगलेच सुनावले. असले प्रकार चालणार नसल्याची तंबी दिली. अन् शेवटी साईनाथ माष्टे व पोचमल्लू उलेंदला यांनी संवादातून समज -मिलाई केली.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.