Student Haircut Case : आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचे जबरदस्तीने केस कापले; मुख्याध्यापक, अधीक्षक निलंबित

Students haircut controversy at Jambhulghat Ashram School leads to action against two officials : चंद्रपूरच्या जांभूळघाट आश्रमशाळेतील प्रकार; चौकशीनंतर प्रशांत गिरी आणि प्रशांत आत्राम यांच्यावर कारवाई, पालकांकडून कठोर कारवाईची मागणी
Student Haircut Case
Student Haircut CaseSarkarnama
Published on: 
Updated on: 

Maharashtra Ashram School : चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील जांभूळघाट येथील शासकीय माध्यमिक आदिवासी पोस्ट बेसिक आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचे जबरदस्तीने केस भादरून टक्कल केल्याच्या प्रकाराने खळबळ उडाली आहे.

या घटनेनंतर संतप्त पालकांनी संबंधितांवर कारवाईची मागणी केली. प्रकरणाची चौकशी केल्यानंतर मुख्याध्यापक प्रशांत गिरी आणि अधीक्षक प्रशांत आत्राम यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

जांभूळघाट येथील आश्रमशाळेत (School) तीन ऑक्टोबरला विद्यार्थ्यांच्या डोक्यावरील केस अर्धवट भादरून त्यांना विद्रूप केल्याचा प्रकार घडल्याचे समोर आले. हा प्रकार बाहेर समजल्यानंतर प्रकरणावर पडदा टाकण्यासाठी विद्यार्थ्यांना रात्री पुन्हा केस कापण्यासाठी भाग पाडण्यात आल्याचा आरोप आहे.

पालकांच्या म्हणण्यानुसार, विद्यार्थ्यांना (Student) रात्री दहा वाजल्यापासून पहाटे चार वाजेपर्यंत जागे ठेवण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांवर मारझोड करून तसेच केस ओढून जबरदस्तीने त्यांचे केस भादरून टक्कल करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकारामुळे विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले.

Student Haircut Case
Shiv Sena BJP clash : सभागृहातून पोलिस ठाण्यात! शिंदे शिवसेना-भाजपचा वाद विकोपाला, महापौरांच्या पतीसह 40 जणांविरोधात गुन्हा

घटनेची माहिती मिळाल्यानंतर पालकांनी संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. विशेषतः आश्रमशाळेचे अधीक्षक प्रशांत आत्राम यांच्यावर कारवाई करावी, तसेच त्यांना पाठीशी घालणाऱ्या मुख्याध्यापक प्रशांत गिरी यांच्यावरही निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी पालकांनी केली.

Student Haircut Case
Ahilyanagar DCC Bank Election : जिल्हा बँकेच्या बैठकीवरून महायुतीत नाराजी? वाकचौरे म्हणाले, ‘शिंदेंना विचारायला हवे होते’

प्रकल्प कार्यालयाकडून चौकशी

या प्रकरणाची दखल घेत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी जागृती कुमरे यांनी ४ ऑक्टोबर रोजी सहाय्यक प्रकल्प अधिकाऱ्यांना चौकशीसाठी पाठवले. चौकशीदरम्यान अधीक्षक प्रशांत आत्राम यांच्याकडील पदभार तातडीने काढून घेण्यात आला. त्यांचा पदभार प्राथमिक शिक्षक निवृत्ती पिसे यांच्याकडे सोपवण्यात आला.

मुख्याध्यापक अन् अधीक्षक निलंबित

यानंतर प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन विभागीय अपर आयुक्तांच्या आदेशानुसार मुख्याध्यापक प्रशांत गिरी यांना निलंबित करण्यात आले. अधीक्षक प्रशांत आत्राम यांच्यावरही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांशी झालेल्या कथित गैरवर्तनाच्या या प्रकरणामुळे आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा आणि प्रशासनाच्या देखरेखीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. चौकशीअंती या घटनेतील जबाबदारी निश्चित होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com