Chandrapur Mayor Election 2026 : चंद्रपुरात काँग्रेसला मोठा धक्का! ठाकरेंच्या पाठिंब्यावर भाजपचा महापौर

BJP Sangita Khandekar Chandrapur mayor : चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौरपदी भारतीय जनता पक्षाच्या संगीता खांडेकर यांची निवड झाली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे भाजपला या महापालिकेत बहूमत नसताना देखील महापौरपद मिळालं आहे.
BJP leader Sangita Khandekar celebrates after being elected Mayor in the Chandrapur Mayor Election 2026, marking a major political upset in the municipal corporation.
BJP leader Sangita Khandekar celebrates after being elected Mayor in the Chandrapur Mayor Election 2026, marking a major political upset in the municipal corporation.Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Chandrapur Mayor Election 2026 : राज्यातील सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या आणि अनेक वाद विवादानंतर चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौरपदी अखेर भारतीय जनता पक्षाच्या संगीता खांडेकर यांची निवड झाली आहे.

आश्चर्याची बाब म्हणजे भाजपला या महापालिकेत बहूमत नसताना देखील मविआतील अंतर्गत वादामुळे आणि स्थानिक राजकारणामुळे अखेर या ठिकाणी दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ झाल्याचं पाहायला मिळत आहे.

66 सदस्य संख्या असलेल्या चंद्रपूर महानगरपालिकेत 34 चा बहुमताचा आकडा आहे. मात्र, भाजप, काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेला कोणालाच बहूमत नसल्यामुळे महापौर पदासाठी या पक्षांमध्ये जोरदार रस्सीखेच पाहायला मिळाली.

शिवाय काँग्रेसमधील वडेट्टीवार–धानोरकर गटातील वादामुळे आणि नंतर ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसमधील बोलणी फिस्कटल्यामुळे अखेर ठाकरेंच्या शिवसेनेने भाजपला पाठिंबा दिला आहे.

BJP leader Sangita Khandekar celebrates after being elected Mayor in the Chandrapur Mayor Election 2026, marking a major political upset in the municipal corporation.
Raj Thackeray : 'संघाने या भानगडीत पडायचंच कशाला? मोहनराव तुम्ही...'; 'त्या' वक्तव्यावरून राज ठाकरेंनी सरसंघचालकांना सुनावलं

ठाकरेंचे जिल्हाध्यक्ष संदीप गिर्हे हे महापौर निवडीआधी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले होते. मात्र या बैठकीत कोणताही तोडगा न निघाल्याने संदीप गिर्हे हे संतापाच्या भरात बैठकीतून बाहेर पडले आणि त्यानतंर त्यांनी भाजपला पाठिंबा दिला.

BJP leader Sangita Khandekar celebrates after being elected Mayor in the Chandrapur Mayor Election 2026, marking a major political upset in the municipal corporation.
Purandar ZP Results : माजी आमदार संजय जगतापांना हाताशी धरत भाजपकडून विजय शिवतारेंच्या गडाला सुरूंग

तर या महापौर पदाच्या निवडणुकीत वंचितचे दोन नगरसेवक गैरहजर राहिले तर एमआयएम तटस्थ राहिली होती. त्यामुळे अवघ्या एका मताने भाजपच्या संगीता खांडेकर यांचा विजय झाला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

BJP, Congress
BJP and Congress
Pratibha Dhanorkar at BJP Dahi Handi Event
Chandrapur Congress Crisis | Vijay Wadettiwar and Pratibha Dhanorkar Groups
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com