Chandrpur Mayor : "बाहेर जा, तुमची गरज नाही" : चंद्रपूरमध्ये भाजप नगरसेवकांच्या 2 गटांत पहिल्याच दिवशी राडा, मुनगंटीवार अन् जोरगेवार समर्थक सभागृहातच भिडले

BJP internal clash Chandrapur : चंद्रपूर महापौर पदग्रहण सोहळ्यात भाजपच्या दोन गटांत शाब्दिक चकमक झाली. मुनगंटीवार आणि जोरगेवार समर्थकांतील वादामुळे महापालिकेत पहिल्याच दिवशी तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले.
Tense scenes inside Chandrapur Municipal Corporation as BJP corporators from rival factions argue during Mayor Sangeeta Khandekar’s oath ceremony.
Tense scenes inside Chandrapur Municipal Corporation as BJP corporators from rival factions argue during Mayor Sangeeta Khandekar’s oath ceremony.Sarkarnama
Published on
Updated on

Chandrapur Municipal Corporation : महापौर पदाच्या निवडणुकीनंतर सुरू झालेल्या आमदार सुधीर मुनगंटीवार आणि आमदार किशोर जोरगेवार यांच्या वादाचे पडसाद नवनिर्वाचित महापौर संगीता खांडेकर यांच्या पदग्रहण सोहळ्यात उमटले. आमदार जोरगेवार यांना या सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले नव्हते. त्यामुळे त्यांच्या समर्थक 16 नगरसेवकांनी संतप्त होत या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला.

हा पदग्रहण सोहळा आमदार मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत पार पडला. निवडणूक प्रमुख आणि स्थानिक आमदार असल्याने किशोर जोरगेवार यांना या सोहळ्याचे निमंत्रण अपेक्षित होते. या कार्यक्रमासाठी भाजप आणि मित्रपक्षांचे नगरसेवक पोहोचले होते. मात्र जोरगेवार यांना निमंत्रण नसल्याचे लक्षात येताच नगरसेवकांनी संताप व्यक्त केला. या नगरसेवकांनी नाराजी दर्शवत कार्यक्रमस्थळावरून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान, आमदार सुधीर मुनगंटीवार समर्थक काही नगरसेवकांनी बाहेर जा, तुमची गरज नाही, असे उद्गार काढल्याने दोन्ही गटांमध्ये शाब्दिक चकमक झाली. यामुळे काही काळ महापालिकेत तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. महापालिकेत सत्तास्थापनेच्या पहिल्याच दिवशी भाजपमधील अंतर्गत संघर्ष उफाळून आल्याने, आगामी काळात भाजपची सत्ता असलेल्या चंद्रपूर महानगरपालिकेत पक्षांतर्गत राजकारण आणखी पेटण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.

Tense scenes inside Chandrapur Municipal Corporation as BJP corporators from rival factions argue during Mayor Sangeeta Khandekar’s oath ceremony.
Chandrapur Mayor : ठाकरेसेना अन् भाजपमध्ये महापौरपदासाठी '6 खोक्यांची' डील? मनसेच्या आरोपांवर चंद्रपूरच्या जिल्हाध्यक्षांचं प्रतिआव्हान

यादी बदलण्यासाठी कारवाई होणार

चंद्रपूर महापालिकेच्या निवडणुकीवेळी भाजप उमेदवारांची यादी प्रदेशाध्यक्षांनी निश्चित केली होती. त्यानंतरही शहराध्यक्षांनी त्यात बदल केले. काही उमेदवारांची नावे कापून आपल्या समर्थकांची नावे घुसवली होती. त्यावरून प्रदेशाध्यक्षांनी चंद्रपूर शहराध्यक्षांची तातडीने हकालपट्टी केली.

Tense scenes inside Chandrapur Municipal Corporation as BJP corporators from rival factions argue during Mayor Sangeeta Khandekar’s oath ceremony.
Chandrapur Mayor : भाजपचा महापौर बसवण्यासाठी काँग्रेसच्याच नेत्याची मदत; त्यांच्याच घरी पहिली बैठक : सुधीर मुनगंटीवारांचा नावासहित गौप्यस्फोट

अशाप्रकारे चंद्रपूर भाजपमध्ये सुरू असलेली गटबाजी सर्वांच्याच निदर्शनास आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याही हा प्रकार लक्षात आला आहे. ते याची निश्चितच दखल घेतली आणि कारवाई करतील असा विश्वासही सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com