Chandrapur Mahapalika: चंद्रपूरमध्ये काँग्रेसच्या गटबाजीचा कहर! आता धानोकरांनी दिलं मोठं आव्हान, व्हॉट्सअप स्टेट्सची चर्चा

Congress Mayor Candidate Chandrapur : नुकत्याच पार पडलेल्या चंद्रपूर महापालिका निवडणुकीत काँग्रेसनं सर्वाधिक जागा जिंकल्या असून मित्रपक्षांसह बहुमत मिळवलं आहे. त्यामुळं इथं सत्तास्थापनेची पूर्ण संधी असताना अद्याप त्यांना सत्ता स्थापनेचा दावा करता आलेला नाही.
Pratibha Dhanorkar vs Vijay Wadettiwar
Pratibha Dhanorkar vs Vijay WadettiwarSarkarnama
Published on
Updated on

Chandrapur Municipal Corporation 2026 : नुकत्याच पार पडलेल्या चंद्रपूर महापालिका निवडणुकीत काँग्रेसनं सर्वाधिक जागा जिंकल्या असून मित्रपक्षांसह बहुमत मिळवलं आहे. त्यामुळं इथं सत्तास्थापनेची पूर्ण संधी असताना अद्याप त्यांना सत्ता स्थापनेचा दावा करता आलेला नाही. याला कारण ठरलंय काँग्रेसमधील गटबाजी! काँग्रेसच्या २७ नगरसेवकांमध्ये दोन गट पडले असून यांपैकी धानोरकर गटाकडं १३ तर वडेट्टीवार गटाकडं १४ नगरसेवक आहेत.

सत्तेतील वाटा आणि स्थानिक प्रभाव टाकण्याच्या हेतून हा वाद निर्माण झाला आहे. यामुळं गेल्या काही दिवसांत अनेक घडामोडी घडल्या पण आता काँग्रेसमधील या गटबाजीनं कहर केला आहे. खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या व्हॉट्सअप स्टेट्सवरुन त्यांनी मोठं आव्हान दिल्याची चर्चा सुरु आहे.

Pratibha Dhanorkar vs Vijay Wadettiwar
Ajit Pawar Legacy: आता पिंपरी-चिंचवडचं नामांतर होणार? अजित पवारांच्या नावावरुन नाव देण्याची मागणी

नेमका वाद काय?

चंद्रपूरमधील काँग्रेसच्या नगरसेवकांनी प्रतिभा धानोरकर यांच्या प्रभावाखाली स्वतंत्र गटाची नोंदणी केली आणि महापौरपदावर दावा केला. हे करत असताना धनोरकरांनी वडेट्टीवारांवर गटबाजी आणि नगरसेवक पळवण्याचा गंभीर आरोप करत त्यांचा गट म्हणजे भाजपची बी टीम असल्याचा आरोप केला.

तर दुसरीकडं वडेट्टीवारांच्या समर्थक नगरसेवकांनी धानोरकर मनमानी करत असल्याचा आरोप करत त्या खासदार असल्या तरी त्यांनी स्वतःला जिल्ह्याचा मालक समजू नये असं म्हटलं आहे. तसंच आमच्या लोकांना त्यांनी ऑफरही दिल्याचे आरोप वडेट्टीवारांच्या नगरसेवकांनी केले.

Pratibha Dhanorkar vs Vijay Wadettiwar
Ajit Pawar Legacy: आता पिंपरी-चिंचवडचं नामांतर होणार? अजित पवारांच्या नावावरुन नाव देण्याची मागणी

प्रदेशाध्यक्षांचाही तोडगाही धुडकावला

काँग्रेसचा हा अंतर्गत वाद मिटवण्यासाठी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रयत्न केले. त्यानुसार गटनेता प्रदेशाध्यक्ष ठरवतील, महापौर धानोरकर ठरवतील आणि स्थायी समितीचा अध्यक्ष वडेट्टीवार ठरवतील असा तात्पुरता तोडगा यावर काढला गेला.

पण त्यानंतर गटनोंदणीवरुन पुन्हा वाद उफाळून आला, त्यानुसार वडेट्टीवार गटानं २० नगरसेवकांची नोंदणी केली त्यानंतर हा वाद आता थेट दिल्लीतील काँग्रेस पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचला आहे. पण काँग्रेसच्या या अंतर्गत वादामुळं मित्रपक्षांचे ३० नगरसेवक हे भाजपकडं जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळं जर असं झालं तर काँग्रेसला चंद्रुपुरातील सत्ता गमवावी लागू शकते.

Pratibha Dhanorkar vs Vijay Wadettiwar
Ajit Pawar Legacy: आता पिंपरी-चिंचवडचं नामांतर होणार? अजित पवारांच्या नावावरुन नाव देण्याची मागणी

धानोरकरांचं स्टेटसद्वारे आव्हान

दरम्यान, खासदार प्रतिभा धानोरकर (Pratibha Dhanorkar) यांनी या सर्व वादात आणि गटबाजीच्या राजकारणात प्रकरण चांगलंच ताणून धरलं असून त्यांच्या ताज्या व्हॉट्सअॅप स्टेट्सची सध्या चर्चा सुरु आहे. याद्वारे त्यांनी वडेट्टीवार गडाला मोठं आव्हान दिलं असून 'जंग मे जाने वाले घोडे, बारातों मे नही नाचते' असं सूचक स्टेट्स त्यांनी ठेवलं आहे. याद्वारे त्यांनी वडेट्टीवार यांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com