Bjp News : महाराष्ट्राचे खरे पप्पु कोण? बावनकुळे यांनी सर्वांनाच झोडले

Political News : भाजपचे नेते आणि राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासह महाराष्ट्रातील ‘पप्पू‘ कोण हे सर्वांनाच ठाऊक आहे, असे सांगून सर्वच नेत्यांना एकाचवेळी झोडून काढले.
 Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar Bawankule Sarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : सध्या मतचोरी आणि मतदार याद्यांमधील घोळामुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. उद्धव आणि राज ठाकरे यांच्या नेतृत्वात सर्व विरोधकांनी एकत्रित मुंबईत मोठा मोर्चा काढला. यावर भाजपचे नेते आणि राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासह महाराष्ट्रातील ‘पप्पू‘ कोण हे सर्वांनाच ठाऊक आहे, असे सांगून सर्वच नेत्यांना एकाचवेळी झोडून काढले.

उद्धव ठाकरे स्वतःला महाराष्ट्राचे राहुल गांधी समजत आहेत. जमेल तिथे ते काँग्रेसचे लांगूलचालन करीत आहेत. त्यांच्या मागे मागे सर्वच धावत आहे. यावरून राज्यात कोण कोण काँग्रेसचे पप्पू झाले आहेत, हे दिसून येते, अशी खोचक टीकाही त्यांनी केली. तत्पूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरे यांना उद्देशून त्यांनी ‘पप्पू‘ यांच्यासारखे वागू नये, असा सल्ला दिला होता.

 Chandrashekhar Bawankule
Uddhav Thackeray: आशिष शेलारांनी खरंच फडणवीसांना पप्पू म्हटलं? उद्धव ठाकरेंनी मानले आभार

बावनकुळे म्हणाले, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर ते केवळ कारणे शोधत आहेत. त्यांच्या खासदारांनीसुद्धा सध्याच्या मतदार यादीवरून निवडणूक जिंकली. मगे ते मतचोरी करून जिंकले का? असा सवाल त्यांनी केला. अशीच मानसिकता त्यांनी कायम ठेवली, तर पुढील २५ वर्ष महाविकास आघाडी पुन्हा सत्तेत येऊ शकणार नाहीत. कामठी, मालेगाव आणि सिल्लोड या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दुबार आणि तिबार मतदार आहेत, काही ठिकाणी चार-चार, पाच-पाच नावे एका कुटुंबात आहेत, हे आरोप बावनकुळे यांनीसुद्धा मान्य केले.

 Chandrashekhar Bawankule
Pune BJP : फडणवीसांनी 'तो' निर्णय जाहीर करताच...पुण्यातील भाजप निष्ठावंतांचा सामुहिक राजीनाम्याचा इशारा

कामठीत सुमारे आठ हजार, सिल्लोडमध्ये 890, आणि मालेगावात सुमारे 130 मतदारांची नावे दुबार आहेत. या संदर्भात आम्ही यापूर्वीच निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. मतदारांची नावे जोडली जातात परंतु डिलीट होत नाहीत, हा मुख्य प्रश्न आहे. मुख्यमंत्र्यांनीही या संदर्भात हायकोर्टात याचिका दाखल केली होती. ब्रह्मपुरी मतदारसंघातील विजय वडेट्टीवार यांचे कार्यकर्ते भाजपमध्ये (BJP) दाखल झाले आहेत. नागपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेश सुरू आहेत.

 Chandrashekhar Bawankule
Eknath Shinde : 'माझे कुटुंब-माझी जबाबदारी' या भूमिकेमुळेच शिवसेचं नुकसान; मुख्यमंत्री शिंदेंची टीका

काँग्रेसमध्ये आता कोणी राहायला तयार नाही. नाना पटोले, विजय वडेट्टीवार आणि कॉंग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यात अंतर्गत मतभेद आहेत. दिवसभर ते शेखचिल्लीसारखे ओरडत असतात, त्यांच्या सोबत कोणी राहायला तयार नाही, अशी टीकाही चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.

 Chandrashekhar Bawankule
Asim Sarode : सनद रद्द होण्यामागे ठाकरेंच्या वकिलाला राजकारणाचा वास : क्रॉनॉलॉजी सांगत पुढच्या लढाईसाठी थोपटले दंड

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com