CM Shinde Bhandara Tour : मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवणे भोवले; भंडाऱ्यात ११ जणांविरुद्ध गुन्हे

Vidharbha News नागपूर विमानतळावरून भंडाऱ्याकडे जात असताना काही जणांनी निवेदन द्यायचे आहे, असे सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा रोखण्याचा प्रयत्न केला, तर काही कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखविले.
CM Eknath Shinde
CM Eknath Shinde Sarkarnama
Published on
Updated on

Bhandara, 25 June : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काळे झेंडे दाखवणे आणि ‘शिंदे सरकार हाय हाय`च्या घोषणा देणे भंडारा जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना चांगलेच महागात पडले. भंडारा पोलिसांनी एकूण ११ जणांविरुद्ध संघटित गुन्हेगारी आणि शांतात भंग केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) हे सोमवारी (ता. २५ जून) भंडारा (Bhandara) जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. जल पर्यटन प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे, तसेच भंडारा व पवनी शहरातील विविध विकास कामांचे त्यांनी ऑनलाईन पद्धतीने उद्‍घाटन केले.

नागपूर विमानतळावरून भंडाऱ्याकडे जात असताना काही जणांनी निवेदन द्यायचे आहे, असे सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा रोखण्याचा प्रयत्न केला, तर काही कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखविले. त्यामुळे पोलिसांची चांगलीच तारंबळ उडाली होती. याची गंभीर दखल राज्य सरकारनेसुद्धा घेतली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज ताफा रोखण्याचा प्रयत्न करणारे आणि काळे झेंडा दाखवणाऱ्यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये आकाश ठवकर, जय डोंगरे, पवन वंजारी, बाळू ऊर्फ गणेश ठवकर, सुनील सुखदेवे, आकाश बोंदरे यांच्यविरुद्ध विना परवाना लोकांना एकत्र जमवून शांतता व कायदा व सुव्यवस्था भंग करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राज्य सरकारच्या वतीने पोलिस अंमलदार स्वप्नील भजनकर यांनी फिर्याद दाखल केली आहे. दुसरा गुन्हा राम बांते, आकाश भोयर, संजय भोयर, हर्षल वाघमारे आणि रोषण भांडारकर यांच्यविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे दाखल करणाऱ्यांमध्ये काही जण गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त होते.

CM Eknath Shinde
Amol Kolhe praised Nilesh Lanke : ‘जिंकलास भावा’ म्हणत कोल्हेंनी थोपटली लंकेंची पाठ अन्‌ विखेंना लगावला टोला!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com