CM Devendra Fadnavis : 'मी, राऊतांसारखा रिकामटेकडा नाही', फडणवीस यांची बोचरी टीका

Devendra Fadnavis On Sanjay Raut : उद्धव ठाकरे सेना महापालिका तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढणार अशी घोषणा खासदार संजय राऊत यांनी केली.
Devendra Fadnavis, Sanjay Raut
Devendra Fadnavis, Sanjay RautSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याबाबत मी माझे मत व्यक्त केले. त्यावर संजय राऊत काय बोलले, काय म्हणाले? हे मला माहित नाही. त्यांच्या प्रत्येक वक्तव्यावर मी माझं मत व्यक्त करावं? मी काही रिकामटेकडा नाही. ते रिकामटेकडे असल्याने रोजच बोलतात, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोचरी टीका केली आहे. ते नागपूरमध्ये बोलत होते.

पुढे फडणवीस म्हणाले, राज ठाकरे माझे मित्र आहेत. मात्र उद्धव ठाकरे हे शत्रू नाहीत, असंही एका मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी आधीच स्पष्ट केलं होतं. त्यावरून संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली होती. ते म्हणाले होते, भाजप आणि शिवसेनेची २५ वर्षांची मैत्री होती. आम्ही भाजपचे सर्वात विश्वासपात्र मित्र होतो.

Devendra Fadnavis, Sanjay Raut
Devendra Fadnavis : राणें-खाडेंची विधाने ठरणार का फडणवीसांच्या वाटेतले काटे?

आता मात्र मित्र राहिलो नाही. भाजपने फोडाफोडीचे आणि सुडाचे राजकारण केले. केंद्रीय तपास यंत्रणेचा वापर केला, अनेकांना जेलमध्ये टाकले. यावेळी राऊत यांनी अप्रत्यपणे देवेंद्र फडणवीस यांनीच मैत्री तोडल्याचा आरोप केला. यावर फडणवीस यांनी राऊतांना रिकामटेकडे असे सांबोधून हा विषय बंद केला.

उद्धव ठाकरे सेनेने महापालिका तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत आता संपुष्टात येणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. यावर फडणवीस म्हणाले, त्यांची आघाडी तुटेल की कायम राहील याकडे आमचे लक्ष नाही. आम्हाला काही फरकही पडत नाही. महाराष्ट्राला प्रगतीकडे नेण्याचा आमचा प्रयत्न आहे.

Devendra Fadnavis, Sanjay Raut
Devendra Fadnavis : 'देवेंद्र फडणवीसांकडे आम्ही मोदींचे पुढील वारसदार म्हणून...!'; काँग्रेसच्या 'या' फायरब्रँड नेत्याचं मोठं विधान

नागपूरमध्ये दोन दिवस मुक्काम

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन दिवसांपासून नागपूरमध्ये आहेत. त्यांनी आज नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्याल व मेयो या दोन इस्पितळांना भेटी दिल्या. दोन्ही इस्पितळांच्या इमारतींना दशक झाले आहे. त्यामुळे या इमारती अद्ययावत करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.

यासाठी एक हजार कोटी रुपयांचा निधी दिला होता. दोन्ही ठिकाणी कामाची प्रगती पाहण्यासाठी मी आलो आहो. दोन्ही इमारतीचे कामे प्रगतीपथावर आहेत. मात्र गती वाढवण्याची आवश्यकता आहे. काही त्रुटी आढळल्या. त्या दुरुस्त करण्याची आवश्यकता आहे. निधीची कमतरता आम्ही पडू देणार नाही. काम दर्जेदार झाले पाहिजे अशी अपेक्षा आहे. एप्रिल महिन्यामध्ये मी पुन्हा आढावा घेणार आहे, असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com